देशात २ हजार ५६८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

गेल्या काही दिवसांमध्ये देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होताना दिसत आहे. देशात कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळे नागरकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये देशात २ हजार ५६८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सोमवारपेक्षा मंगळवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ […]

देशात २ हजार ५६८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

गेल्या काही दिवसांमध्ये देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होताना दिसत आहे. देशात कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळे नागरकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये देशात २ हजार ५६८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सोमवारपेक्षा मंगळवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाली आहे. सोमवारी देशात २ हजार ५०३ रुग्णांची नोंद झाली होती, तर २७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या देशात ३३ हजार ९१७ कोरोना रुग्ण आहेत. तर आजवर ५ लाक १५ हजार ९७४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशाचा मृत्यूदर १.२० टक्के इतका झाला आहे.

राज्यात मागील २४ तासांत २०७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच २९० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number