Kurla Food Poisoning : कुर्ल्यात मोमोज खाल्ल्याने अनेकांना उलटी, जुलाब, ताप अन् पोटदुखीचा त्रास; 16 जणांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर

कुर्ल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुर्ल्यात मोमोज खाल्ल्याने 16 जणांना फूड पॉइझनिंग झालं असून १६ पैकी १४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Kurla Food Poisoning : कुर्ल्यात मोमोज खाल्ल्याने अनेकांना उलटी, जुलाब, ताप अन् पोटदुखीचा त्रास; 16 जणांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर

कुर्ल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुर्ल्यात मोमोज खाल्ल्याने 16 जणांना फूड पॉइझनिंग झालं असून १६ पैकी १४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कुर्ल्यातील सुंदरबाग परिसरात 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मोमोज खाल्ल्यानंतर 16 जणांना उलटी, जुलाब, ताप, पोटदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास जाणवू लागला. त्रास जाणवल्यानंतर सर्वांना कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा- Farmers Protest : सरकार आंदोलन दडपतयं? महामार्गावर शेतकऱ्यांचा ठिय्या; शेतकरी संघटनेच्या राजीव कसबेंसह शेकडो शेतकरी पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान 16 पैकी 14 जणांना रुग्णालयात दाखल केले असून त्यातील 2 जणांवर ओपीडीच्या माध्यमातून उपचार सुरु आहेत. धक्कादायक म्हणजे,  रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णांवर उपचार सुरू असून सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. यावेळी घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांची भाभा रुग्णालयाला भेट दिली.

हरिष भांदिर्गे यांनी रुग्णांची विचारपूस करून डॉक्टरांकडून रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच संपूर्ण प्रकरणाची आवश्यक ती तपासणी करून योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. फूड पॉइझनिंगचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपासणी सुरू आहे. कुर्ल्यातील या घटनेमुळे रस्त्यावरील तसेच खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांमधील अन्नपदार्थांच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number