Ganeshotsav Festival 2026 : मुंबई, गुजरातसह विविध भागांतून कोकणात येणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेवरची खास भेट; रेल्वेच्या आणखी 16 विशेष फेऱ्या वाढवल्या

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने आणखी 16 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 8 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाड्यांव्यतिरिक्त या अतिरिक्त 16 फेऱ्या धावणार आहेत. रेल्वेने या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून मुंबई सेंट्रल–ठोकूर, मुंबई सेंट्रल–सावंतवाडी रोड, वांद्रे टर्मिनस–रत्नागिरी, वडोदरा–रत्नागिरी, विश्वामित्री–रत्नागिरी, उधना–रत्नागिरी आणि वलसाड–रत्नागिरी या मार्गांवर विशेष […]

Ganeshotsav Festival 2026 : मुंबई, गुजरातसह विविध भागांतून कोकणात येणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेवरची खास भेट; रेल्वेच्या आणखी 16 विशेष फेऱ्या वाढवल्या

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने आणखी 16 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 8 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाड्यांव्यतिरिक्त या अतिरिक्त 16 फेऱ्या धावणार आहेत. रेल्वेने या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून मुंबई सेंट्रल–ठोकूर, मुंबई सेंट्रल–सावंतवाडी रोड, वांद्रे टर्मिनस–रत्नागिरी, वडोदरा–रत्नागिरी, विश्वामित्री–रत्नागिरी, उधना–रत्नागिरी आणि वलसाड–रत्नागिरी या मार्गांवर विशेष गाड्या धावणार आहेत. परतीच्या मार्गावरही विशेष रेल्वे सेवा उपलब्ध असेल. गुजरातसह इतर भागातील प्रवाशांची विशेष सोय करण्यात आली असून या विशेष गाड्यांचे ऑनलाइन बुकिंगही सुरू झाले आहे.

हेही वाचा : Stray Dogs In Satara : मलकापूर शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत, कुत्र्यांच्या टोळक्यांचा मुलीवर हल्ला; थरारक व्हिडीओ समोर

यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने मुंबई आणि पुण्याहून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वेगाड्यांची सोय केली आहे. यापूर्वीच रेल्वे प्रशासनाने सुमारे २५० विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची योजना आखली आहे. ज्यामुळे बाप्पाच्या दर्शनासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर होणार आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण २४ जुलैपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. विशेष गाड्यांसाठी आरक्षण सुरू झाले आहे. अनारक्षित डब्यांसाठी तिकीट आरक्षण (UTS) अतिजलद मेल/एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कानुसार करता येईल. मध्य रेल्वेकडून गणपती स्पेशल रेल्वे गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. या रेल्वे गाड्या कोकण रेल्वेमार्गे धावणार आहेत. या गाड्या मुंबई, पुणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून रत्नागिरी, सावंतवाडी, मडगाव आणि चिपळूण या प्रमुख स्थानकांपर्यंत धावतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number