नायलॉन दोरीमुळे 12 वर्षीय मुलाने गमावला जीव

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सारस्ते गावात नायलॉन दोरीचा फास बसल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उमेश कुवर असे त्या मुलाचे नाव आहे. झोका खेळत असताना फास लागून उमेशचा मृत्यू झाला. उमेशच्या घरात लहान बाळासाठी बांधलेल्या नायलॉन दोरीच्या झोका बांधण्यात आला आहे. रविवारी दुपारी 3 च्या सुमारास बांधलेल्या झोक्यावर […]

नायलॉन दोरीमुळे 12 वर्षीय मुलाने गमावला जीव

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सारस्ते गावात नायलॉन दोरीचा फास बसल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उमेश कुवर असे त्या मुलाचे नाव आहे. झोका खेळत असताना फास लागून उमेशचा मृत्यू झाला.

उमेशच्या घरात लहान बाळासाठी बांधलेल्या नायलॉन दोरीच्या झोका बांधण्यात आला आहे. रविवारी दुपारी 3 च्या सुमारास बांधलेल्या झोक्यावर उमेश झोके घेत खेळत होता. मात्र, झोके घेत असतानाच त्याला दोरीचा फास बसला आणि तो गंभीर जखमी झाला.

हे बघताच उमेशच्या चुलत भावाने त्याला तात्काळ नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले. मात्र, काहीच उपयोग झाला नाही. उपचार सुरु होण्यापूर्वीच तो हे जग सोडून गेला होता.

हर्सुल पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर कुवर कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अशाप्रकारे अपघातांमध्ये चिमुकल्यांचा जीव जाण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या लहान मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number