पुणे, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : पुण्यातील कोथरूड शास्त्रीनगर येथील विवेकानंद कॉलनीतील एका सदनिकेवर चोरट्यांनी डल्ला मारला. साडेतीन लाख रुपये किमतीचे सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना १५ ते १७ मार्च या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने कोथरूडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.