संदेशखाली हिंसेप्रकरणी शाहजहान शेखला अटक

संदेशखाली हिंसेप्रकरणी शाहजहान शेखला अटक

बशीरहाट, २९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : संदेशखाली येथील महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि जबरदस्तीने जमिनी ताब्यात घेण्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेखला पोलिसांनी अटक केली आहे. तो मागील ५५ दिवसांपासून फरार होता. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस शाहजहान शेखला वाचवत असल्याचा आरोप भाजपाने केला. अखेर शाहजहान शेखला पश्चिम बंगाल पोलिसांनी उत्तर २४ परगणा येथून अटक केले. अटक केल्यानंतर त्याला बशीरहाट येथे न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी शाहजहान शेखला दहा दिवसांची पोलीस कोठडी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version