साईबाबांना अर्धा किलोचा सोन्याचा मुकुट

साईबाबांना अर्धा किलोचा सोन्याचा मुकुट

शिर्डी, ९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : बंगळुरू येथील डॉ. राजाराम कोटा यांनी साईबाबांना अर्धा किलो वजनाचा २९ लाख रुपयांचा सोन्याचा मुकुट अर्पण केला. या मुकुटाचे वजन ५०४ ग्रॅम आहे. मुकुटावर आकर्षक नक्षीकाम केले आहे. साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवळे यांनी कोटा परिवाराचा साईबाबांची मूर्ती आणि शोल देऊन सत्कार केला. भक्तांनी मागील दहा दिवसांत साईबाबांना सोळा कोटी रुपयांचे दान दिले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version