माजी नगराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू

माजी नगराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू

लातूर, ९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : लातूर जिल्ह्यातील उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या मुलाचा प्रसाद निटुरे याचा अपघाती मृत्यू झाला. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात जिथे झाला त्या घटनास्थळी मोटार उलटली. उलटलेल्या मोटारीचा पुरता चुराडा झाला होता. पहाटेच्यावेळी नागपूर रत्नागिरी महामार्गावरील आशिव पाटी येथे हा अपघात झाला. रस्त्यावर थांबलेल्या भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर प्रसाद निटूरे यांची भरधाव वेगात असणारी मोटार आदळली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version