अलिबाग, ३१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : नववर्ष स्वागताचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत आहेत. मुंबईतून बोटीने अलिबागला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असून मांडवा जेटिवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पर्यटकांच्या सुविधेसाठी मेरीटाईम बोर्डाने नियोजन केलंय. प्रवाशांची संख्या लक्षात घेता जादा बोटी सोडण्यात येत आहेत. रो-रो सेवेच्या फेऱ्या देखील वाढवण्यात आल्या आहेत. गर्दीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आणि मेरी टाईम बोर्ड समन्वयाने काम करीत आहे. सोमवारी परतीच्या प्रवासात गर्दी नियंत्रणासाठी जेटीवर बॅरीगेटींग करण्यात येणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे –
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.