हिंगोलीत अवकाळी पाऊस

हिंगोलीत अवकाळी पाऊस

हिंगोली, ३० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : हिंगोली जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून वादळी वार्‍यासह गारपीट सुरू आहे. यामुळे फळ उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा,दांडेगाव,गिरगाव ,परिसरात मोठ्या प्रमाणत केळीची लागवड केली जाते,यंदा केळीला खूप चांगला भाव असून केळी सुद्धा मोठ्या प्रमाणात लागल्या होत्या, पण वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने केळी, पपई,ज्वारी, तुर,पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, लाखो रुपये खर्चून उभारलेला केळीचा फड जमीनदोस्त झाल्याने शेतकर्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला आहे,यामुळे शेतकरी आता शासनाच्या मदतीकडे आस लावून बसले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version