महाराष्ट्रात रविवारपासून थंडी ?

महाराष्ट्रात रविवारपासून थंडी ?

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रात ठिकठिकाणी किमान तापमान चौदा ते पंधरा अंश सेल्सिअस आहे. सकाळी गारठा जाणवू लागला आहे. नाशिक, नगर, पुणे, नंदुरबार, जळगाव, अमरावती, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत थंडी जाणवू लागली आहे. रविवारपर्यंत जवळपास पूर्ण राज्यात थंडी जाणवू लागेल. पण मुंबईमध्ये २२ नोव्हेंबरपर्यंत थंडी जाणवणार नाही. मुंबईच्या काही भागात सकाळी गारठा जाणवेल पण तो मर्यादीत काळापुरताच असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version