मुंबई, २८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना काय केले, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीत झालेल्या सभेत उपस्थित केला. पंतप्रधान मोदी यांचा हा प्रश्न राज्यसभा खासदार शरद पवार यांना जिव्हारी लागला. शरद पवार यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी कृषीमंत्री म्हणून केलेल्या कामांची यादी वाचून दाखवली. ‘मी कृषीमंत्री असताना गहू आयतीला परवानगी दिली’, असेही शरद पवार म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.