केशवनगरवासीयांचा पुणे पालिकेवर मोर्चा

केशवनगरवासीयांचा पुणे पालिकेवर मोर्चा

पुणे, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : केशवनगरमधील रस्त्यांची दूरवस्था झाल्यामुळे तेथील रहिवाशांकडून पुणे महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेबाहेर केशवनगर येथील रहिवाशांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी ऑक्सिजनचे मास्क तसेच खड्ड्यांमुळे मणक्यांना त्रास होऊ नये यासाठी कंबरपट्टा लावत अनोखे आंदोलन करण्यात आले. केशवनगर येथील रहिवाशांकडून पुणे महानगरपालिका प्रत्येक कर वसूल करते, मात्र मूलभूत सेवा पुरवत नाही असा आरोप करत हा धडक मोर्चा काढण्यात आला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version