महाराष्ट्र इंटरनॅशनल रोजगार सुविधा केंद्र

मुंबई, ५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDSD) अंतर्गत ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राचे उद्घाटन आणि आयटीआयमधील ५८ विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी ४ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]

महाराष्ट्र इंटरनॅशनल रोजगार सुविधा केंद्र

मुंबई, ५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDSD) अंतर्गत ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राचे उद्घाटन आणि आयटीआयमधील ५८ विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी ४ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित असतील.

आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्रामार्फत परदेशात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या राज्यातील उमेदवारांची नोंदणी, माहिती संकलन तयार करणे, प्रशिक्षण देणे हे उपक्रम राबवण्यात येणार आहे. राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून प्रथमच नाविन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्र निर्माण करण्यात आले असून यामध्ये राज्यातील कुशल आणि अकुशल उमेदवारांसाठी इतर देशांमध्ये आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध करून देणे आणि आंतरराष्ट्रीय सल्लागार सेवांचा लाभ देता येणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील आयआयटी मधून जपानमध्ये तीन आणि जर्मनीमध्ये ५५ अशा परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या ५८ विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number