छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जयंतीच्या पूर्वसंध्येला उद्धव गटाच्या वतीने रविवारी (१५ मे) भव्य मशाल वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर असे नामकरण झाल्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या उत्साहात संभाजी महाराज यांची जयंती शहरात साजरी होत आहे. क्रांती चौक येथून भव्य मशाल रॅली काढून टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली. ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार आणि जिल्हा प्रमुख किशनचंद तनवाणी यांनी दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.