हसन मुश्रीफ पुन्हा ईडीच्या रडारवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी आज ईडीने पुन्हा एकदा धाड टाकली. हसन मुश्रीफ यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालय अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा धाड टाकली आहे. हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घरावर ईडीने आज पाहाटे ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. विशेष म्हणजे गेल्या २ महिन्यात ईडीची ही तिसरी कारवाई आहे. त्यामुळे […]

हसन मुश्रीफ पुन्हा ईडीच्या रडारवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी आज ईडीने पुन्हा एकदा धाड टाकली. हसन मुश्रीफ यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालय अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा धाड टाकली आहे. हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घरावर ईडीने आज पाहाटे ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. विशेष म्हणजे गेल्या २ महिन्यात ईडीची ही तिसरी कारवाई आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्याचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे आमदार मुश्रीफ मुंबईला होते. ते शनिवारी पहाटे कोल्हापूरला पोहोचणार असल्याची माहिती होती. दरम्यान, ही धाड पडली आहे.

संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर धाड पडली आहे. यामधील कथित ४० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर आयकर विभाग आणि ईडीने छापेमारी सुद्धा केली होती. आता पुन्हा एकदा ईडीने याप्रकरणावरून मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रीया दिली. हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने पुन्हा पुन्हा धाड टाकणे म्हणजे संबंधित व्यक्तीला नाहक त्रास देण्याचा प्रकार आहे. एकाच व्यक्तीच्या घरावर ईडी, आयटी किती वेळा धाड टाकणार? अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या कारवाया आणि इतर गोष्टींबाबत मुंबई हायकोर्टाने कालच ताशेरे ओढले आहेत. असे असूनही ईडी असा प्रकार घडत आहे. मुश्रीफ यांना त्रास देण्याचे विविध प्रकार या आधीच करुन झाले आहेत. तरीही ते बधत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दबाव टाकण्यासाठी, त्यांना त्रास देण्यासाठी वारंवार हे प्रकार पाहायला मिळत आहेत. खरे म्हणजे देशात असा प्रकार कधीच घडत नव्हता. जो अलिकडील काळात मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे, जयंत पाटील म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number