मुंबईकरांचं अर्थसंकल्पाकडे लक्ष

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व दिल्ली व गोवा राज्याच्या अर्थसंकल्पाहून मोठा अर्थसंकल्प असणाऱ्या मुंबई महापालिकेचा २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प शनिवारी सादर होणार आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा बजेट प्रशासकाकडून सादर केला जाणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बाल सिंह चहल मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प हा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर […]

मुंबईकरांचं अर्थसंकल्पाकडे लक्ष

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व दिल्ली व गोवा राज्याच्या अर्थसंकल्पाहून मोठा अर्थसंकल्प असणाऱ्या मुंबई महापालिकेचा २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प शनिवारी सादर होणार आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा बजेट प्रशासकाकडून सादर केला जाणार आहे.

मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बाल सिंह चहल मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प हा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सादर होणार असल्याने आरोग्य, शिक्षण, रस्ते यासाठी भरीव तरतुदीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्यक्षात मुंबईकरांना काय मिळणार हे ४ फेब्रुवारी रोजीच स्पष्ट होणार आहे.

मुंबईचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना काही सूचना केल्या आहेत. शनिवारी सादर होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रदुषण नियंत्रण, आरोग्य व्यवस्था सशक्तीकरण, प्रशासनात पारदर्शकता, सुशोभीकरण यावर भर दिला जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणूक वर्षातील अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या पदरी काय पडणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number