10 वर्षांच्या ‘वंडरगर्ल’ने वाचवले 12-13 जणांचे प्राण!

तुषार शेटे, जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई   मुंबईच्या परळ भागात क्रिस्टल टॉवर मध्ये आग लागल्यानंतर या इमारतीत भीतीचं वातावरण पसरलं. आग लागताच राहिवाश्यांचा आक्रोश सुरू झाला. मात्र अश्या प्रतिकूल परिस्थितीतही प्रसंगावधान राखलं, ते 10 वर्षांच्या चिमुकलीने. झेन सदावर्ते या सहावीत शिकणा-या मुलीने तब्बल 12 ते 13 लोकांचे प्राण वाचवले. कसे वाचवले तिने लोकांचे प्राण? […]

10 वर्षांच्या ‘वंडरगर्ल’ने वाचवले 12-13 जणांचे प्राण!

तुषार शेटे, जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

 

मुंबईच्या परळ भागात क्रिस्टल टॉवर मध्ये आग लागल्यानंतर या इमारतीत भीतीचं वातावरण पसरलं. आग लागताच राहिवाश्यांचा आक्रोश सुरू झाला. मात्र अश्या प्रतिकूल परिस्थितीतही प्रसंगावधान राखलं, ते 10 वर्षांच्या चिमुकलीने. झेन सदावर्ते या सहावीत शिकणा-या मुलीने तब्बल 12 ते 13 लोकांचे प्राण वाचवले.

कसे वाचवले तिने लोकांचे प्राण?

तिसरीत असताना डिझास्टर संदर्भात असलेल्या प्रोजेक्टची तिला आठवण झाली.

अशी परिस्थिती उद्भवल्यास काय करायला पाहिजे हे तिला आठवलं.

धूर मोठ्या प्रमाणात पसरल्यावर तिने लोकांच्या नाका-तोंडाला ओला कापसाचे मास्क लावले

यामुळे धुरामुळे गुदमरण्यापासून लोक बचावले

जे प्रौढांना जमले नाही ते या चिमुकलीने करून दाखवले. यामुळे तिने फक्त आपले आणि आपल्या कुटुंबाचेच नाही तर 12 ते 13 लोकांचे प्राण वाचवले आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number