मतदार नोंदणी १९ ऑक्टोबरपर्यंत करता येणार

निवडणुकीसाठी राज्यात १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष एस. चोक्कलिंगम यांनी ही माहिती दिली. 

मतदार नोंदणी १९ ऑक्टोबरपर्यंत करता येणार

मुंबई : महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात विधानसभेसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होईल आणि २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी राज्यात १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष एस. चोक्कलिंगम यांनी ही माहिती दिली. 

मतदार नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करता येईल. यासाठी व्होटर हेल्पलाईन अॅप (Voter Helpline App) किंवा https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाच्या पर्यायाचा वापर करता येईल. पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच आधारकार्ड आणि पॅनकार्ड असल्यास मतदार नोंदणीची प्रक्रिया झटपट करणे शक्य आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number