Donald Trump : ट्रम्प यांना धक्का! जगाला दिलासा मिळणार?; टॅरिफ धोरणावर सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केले गंभीर प्रश्न

कनिष्ठ न्यायालयाने आधीच ट्रम्प यांना शुल्क लादण्याचा अधिकार नाही असे स्पष्ट केले होते. आता सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या धोरणावरच शंका घेतल्याने ट्रम्पसमोर अडचणी वाढल्या आहेत.<br/>
Donald Trump : ट्रम्प यांना धक्का! जगाला दिलासा मिळणार?; टॅरिफ धोरणावर सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केले गंभीर प्रश्न

Tariff Disputes: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या वादग्रस्त टॅरिफ धोरणावर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.  5 नोव्हेंबर रोजी झालेल्या अंतिम सुनावणीदरम्यान, अनेक न्यायाधीशांनी ट्रम्प यांच्या अधिकारांवर आणि निर्णयप्रक्रियेवर आक्षेप घेतले. कनिष्ठ न्यायालयाने आधीच ट्रम्प यांना शुल्क लादण्याचा अधिकार नाही असे स्पष्ट केले होते. आता सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या धोरणावरच शंका घेतल्याने ट्रम्पसमोर अडचणी वाढल्या आहेत.

हेही वाचा – Pakistan : असीम मुनीरची ताकद आणखी वाढणार! पाकिस्तान सरकार 27 वी घटनादुरुस्ती करण्याच्या तयारीत

या प्रकरणात 12 राज्ये आणि लहान उद्योगांच्या गटाने ट्रम्पच्या टॅरिफला आव्हान दिले आहे. त्यांचा आरोप आहे की, ट्रम्प यांनी शुल्कांचा परिणाम विचारात घेतला नाही आणि कोणतेही औपचारिक मूल्यांकन न करता निर्णय घेतला. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सोनिया सोटोमायर यांनी स्पष्टपणे विचारले, जर शुल्क महसूल वाढवत असतील, तर ते करच नाहीत का? 

हेही वाचा –Pakistan Terrorist Squad: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानचा नवा कट उघड! गुप्तचर अहवालात धक्कादायक खुलासा 

दरम्यान, न्यायमूर्ती जॉन रॉबर्ट्स यांनी ट्रम्प प्रशासनाच्या “अमर्याद अधिकार” दाव्यावरच प्रश्न उपस्थित केले. तथापी, अंतिम निर्णय जरी अद्याप बाकी असला तरी, न्यायालयाची भूमीका ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाविरोधात झुकलेली दिसते. त्यामुळे हा निकाल ट्रम्पसाठी धक्का आणि जगासाठी दिलासा ठरू शकतो. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version