Makeup Products | ऑफिस-कॉलेजसाठी परफेक्ट Natural Look! मेकअप किटमध्ये असायलाच हवे हे’ प्रोडक्ट्स

मेकअप म्हटलं की भली मोठी प्रोडक्ट्सची लिस्ट डोळ्यासमोर येते. अनेक जण Everyday Look किंवा Natural लूक दररोजच्या वापरासाठी पसंत करतात.

Makeup Products | ऑफिस-कॉलेजसाठी परफेक्ट Natural Look! मेकअप किटमध्ये असायलाच हवे हे’ प्रोडक्ट्स

Beauty Tips | मेकअप म्हटलं की भली मोठी प्रोडक्ट्सची लिस्ट डोळ्यासमोर येते. अनेक जण Everyday Look किंवा Natural लूक दररोजच्या वापरासाठी पसंत करतात. पण तुम्हाला माहितीये का दररोजच्या मेकअपसाठी खूप साऱ्या प्रोडक्ट्सची गरज नसते. काही मोजक्या प्रोडक्ट्सच्या मदतीनेही चेहऱ्याला फ्रेश आणि नॅचरल लूक देता येतो. ऑफिस, कॉलेजसाठी सिंपल आणि नॅचरल लूक हवा असेल, तर 'हे' बेसिक मेकअप प्रोडक्ट्स पुरेसे आहेत. या प्रोडक्ट्सच्या मदतीने तुम्ही कमी वेळात फ्रेश आणि सुंदर लूक सहज मिळवू शकता. दररोजच्या वापरासाठी 'हे' प्रोडक्ट्स तुमच्या मेकअप किटमध्ये असायला हवेत, ते जाणून घेऊया. 

1.बीबी क्रीम (BB Cream) किंवा स्किन टिंट (Skin Tint)

हेवी फाउंडेशन वापरायचे नसेल तर बीबी क्रीम किंवा स्किन टिंटचा वापर करा. यामुळे त्वचेला हलके कव्हरेज मिळून चेहरा फ्रेश दिसतो. बीबी क्रीम त्वचेला हलके कव्हरेज देण्यासोबत मॉइश्चराइज करण्याचे काम ही करते. तर स्किन टिंट त्वचेवर अगदी हलका बेस तयार करतो आणि नैसर्गिक टेक्स्चर दिसू देतो. रोजच्या वापरासाठी किंवा नो-मेकअप लूक आवडणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.  

2. कन्सीलर (Concealer) 

कन्सीलरचा वापर डोळ्यांखालील डार्क सर्कल्स, पिंपल्सचे डाग किंवा इतर छोटे डाग लपवण्यासाठी केला जातो. पूर्ण चेहऱ्यावर कन्सीलर लावण्याऐवजी फक्त आवश्यक असेल्या ठिकाणी याचा वापर करा आणि नीट ब्लेंड करा. यामुळे तुम्हाला नॅचरल लूक मिळू शकतो. कन्सीलर निवडताना तुमच्या शेड नुसार निवडावा. 

3. आयलाइनर किंवा काजळ  (Eyeliner or Kajal )

डोळ्यांना आकर्षक आणि डेफिन्ड (Defined) लूक देण्यासाठी हे दोन उत्तम पर्याय आहेत. आयलाइनर डोळ्यांचा आकार उठावदार करतो तर काजळामुळे डोळ्यांना अधिक फ्रेश लूक मिळतो. या दोंघांमुळे डोळ्यांना सुंदर लूक मिळतो. Everyday Look साठी हलका आयलाइनर किंवा काजळाचा साधा टच पुरेसा आहे. 

4.  ब्लश  (Blush)  

गालांवर थोडासा ब्लश लाववल्याने चेहरा लगेच फ्रेश आणि हेल्दी लूक देतो. ब्लश मध्ये वेगवेगळे प्रकार आहे पण त्यात क्रीम ब्लश जास्त चांगला पर्याय आहे. क्रीम ब्लश असल्यास तो बोटांनी सहज चेहऱ्यावर ब्लेंड करता येतो आणि जास्त वेळ ही लागत नाही. Everyday Look साठी खूप गडद रंगाऐवजी सॉफ्ट पिंक, पीच किंवा तुमच्या त्वचेच्या टोनला सूट होणारा शेड निवडू शकता. ब्लश लावल्याने चेहरा अधिक glowing दिसायला लागतो. 

5. लिपस्टिक किंवा लिप बाम ( Lipstick or Lip Balm ) 

लिपस्टिक किंवा लिप बाम शिवाय कुठला ही मेकअप लूक अपूर्ण आहे. Everyday Look साठी पिंक, पीच, न्यूड किंवा हलक्या ब्राऊन शेड्सची लिपस्टिक छान दिसते. त्याचबरोबर ओठांना मऊ आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी लिप बाम परफेक्ट पर्याय आहे. रंग जर तुम्हाला नको असेल तर साधा लिप बाम वापरा. हलका नॅचरल टिंट हवा असेल तर टिंटेड लिप बाम वापरू शकता. लिपस्टिक किंवा लिप बाम Everyday Look साठी उत्तम पर्याय आहे 

 Natural मेकअपसाठी काही टिप्स : 

1. मेकअप करण्याआधी चेहरा स्वच्छ करून मॉइश्चरायझर  लावावे. 
2. प्रत्येक प्रोडक्ट त्वचेवर व्यवस्थित ब्लेंड करा.
3. तुमच्या स्किन टोनशी जुळणारे शेड्स निवडा. 
4. जास्त लेअरचा मेकअप करणे टाळा. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number