हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व असते. श्रावण महिन्याची सुरुवात आणि समाप्ती हिंदू पंचांगाच्या पद्धतीनुसार तसेच प्रादेशिक परंपरेनुसार वेगवेगळी असते. मात्र शिवपूजा, सोमवारचे व्रत यात बहुधा फरक नसतो. भक्त उपवास करत भगवान शंकराची विशेष पूजा करतात. हा उपवास सोमवारसह शनिवारी सुद्धा केला जातो. यंदा शेवटच्या सोमवारी वैदिक पंचांगानुसार एक दुर्मिळ योग जुळून आला आहे.
हा योग दुर्मिळ का आहे?
– हा योग विशेष ठरणार आहे कारण श्रावणी सोमवार आणि अजा एकादशी एकत्र येत आहे. अजा एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असलेली महत्त्वाची एकादशी तिथी आहे. त्यामुळे धार्मिकदृष्ट्या हा योग महत्त्वपूर्ण मानला जातो. हा शेवटचा श्रावणी सोमवार महाराष्ट्रातील अमांत पंचांगानुसार 2026 मधील 7 सप्टेंबर रोजी येत आहे. तसेच हा योग तब्बल ७१ वर्षांनी जुळून आला आहे. त्यात यंदाची श्रावणी अमावस्यासुद्धा शेवटच्या श्रावणी सोमवारीच आहे.
यादिवशी शिवलिंगावर कुठली शिवामूठ अर्पण करावी ?
श्रावणात शिवपिंडीवर शिवामूठ अर्पण करण्याची प्रथा आहे. ही प्रथा विशेषतः महाराष्ट्रात प्रचलित आहे. या परंपरेनुसार श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर वेगवेगळे धान्य अर्पण केले जाते. काही ठिकाणी पाच सोमवारांसाठी वेगवेगळी धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे. यादिवशी जवस आणि सातू हे धान्य अर्पण केले जातील.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)