Monsoon Foot Care : सतत पावसाच्या पाण्यात चालतायं? तर ‘या’ गोष्टी नक्की करा; अशी राखा पायाची निगा

Monsoon Foot Care : सतत पावसाच्या पाण्यात चालतायं? तर ‘या’ गोष्टी नक्की करा; अशी राखा पायाची निगा

पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात पाय भिजल्याने फंगल इन्फेक्शन आणि दुर्गंधीचा धोका वाढण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात पायाची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. यावर उपाय म्हणून बाहेरून आल्यावर पाय कोमट पाणी व अँटीबॅक्टेरिया साबणाने लगेच धुवावे. तसेच बोटांच्या मधील भाग कोरड्या टॉवेलने पुसून अँटीफंगल पावडर वापरावी. सुती किंवा शोषक मोजे वापरावेत. तसेच ओले शूज-मोजे लगेच बदलून टाकावे. पावसाळ्यात पायांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी काही गोष्टी केल्यास तुमचे पाय कोमल आणि मुलायम राहण्यास मदत होईल.

हेही वाचा : Vat Pornima Special Look : उकाडा असो की पावसाळा, कुठल्याही वातावरणात सुखावणारी ‘मलमल लोटस कॉटन साडी’; या वटपौर्णिमेला नक्की ट्राय करा

पायांची काळजी घेण्यासाठी हे करा – 

पाय कोरडे ठेवणे : पाय जास्त वेळ ओले राहिल्यास 'अ‍ॅथलीट फूट' (Athlete's foot) सारखे बुरशीजन्य आजार होऊ शकतात. आंघोळीनंतर किंवा पावसात भिजल्यावर बोटांच्या फटींमध्ये लक्ष देऊन टॉवेलने पाय पुसा.

पावसातील योग्य पादत्राणे : उघड्या चपलांपेक्षा जे शूज किंवा चपला पाण्याला सहज प्रतिकार करू शकतात, त्यांचा वापर करा.

मोज्यांची निवड : जाड सुती मोजे पाणी शोषून घेतात. त्यामुळे शोषक व पातळ मोजे किंवा रबरी पादत्राणे वापरणे सोयीचे पडते. नखांची स्वच्छता: नखांमध्ये घाण साचून राहिल्याने संसर्ग वाढू शकतो. नखे नेहमी छोटी व व्यवस्थित कापून ठेवावी.

पायांना वाफ/कोमट पाणी : जर पाय अस्वच्छ किंवा गटाराच्या पाण्यात गेले असतील, तर घरी आल्यावर काही वेळ पाय कडुलिंबाच्या किंवा मिठाच्या कोमट पाण्यात बुडवून ठेवावे.

मॉइश्चरायझरचा वापर : पाय कोरडे पडत असतील किंवा भेगा पडत असतील, तर झोपण्यापूर्वी फूट क्रीम किंवा मॉइश्चरायझर नक्की लावावे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version