केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओने विकसित केलेल्या कोविड विरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण केलं. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे देखील यावेळी उपस्थित होते.
कोविड -१९ विरूद्ध लढा देण्यासाठी 2-डीजी औषध हा एक नवीन आशेचा किरण आहे, असे राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे कोरोना प्रतिबंधक औषध आहे.
काय आहे 2- DG औषध?
- 2 – DG हे स्वदेशी कोरोना प्रतिबंधक औषध
- हे पहिलं औषध जे कोरोना विषाणूचा प्रसार थांबवते.
- औषध चूर्ण स्वरूपात असून पाण्यात विरघळून तोंडावाटे घेऊ शकता.
- यामुळे, लसीकरणावरील ताण कमी होऊ शकतो. भारताचे चलन वाचू शकते.
- 2-DG ला लागणारे घटक सहजगत्या उपलब्ध असल्याने मुबलक उत्पादन करणं शक्य
- सौम्य आणि मध्यमच नव्हे तर तीव्र स्वरुपाच्या रुग्णांवर देखील वापरता येणार.
- हे औषध लक्षण दिसताच अथवा रुग्णालयात दाखल झाल्याच्या पहिल्या दिवसापासून डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरता येणार.
- 2 – DG औषध रुग्णांच्या शरिरातील संक्रमित पेशींपर्यंत पोहचून कोरोना विषाणूचा फैलाव थांबवू शकतं.
- सदर औषध कोरोनाच्या विविध विषाणूंविरोधातही प्रभावी.
- फुफ्फुसातील विषाणूच्या संसर्गावर गुणकारी
- 2-DG या औषधाची दोन यशस्वी चाचण्यांच्यानंतर तिसरी चाचणी देशभरातल्या विविध राज्यांमधल्या 27 कोविड हॉस्पिटल घेण्यात आली.
- तिसऱ्या चाचणीत रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी झाला. परिणामी रुग्ण लवकर घरी जाऊ शकले.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी गुणकारी ठरले असून ऑक्सिजन कमतरतेवर प्रभावी ठरले आहे.
- डीआरडीओला एप्रिल २०२०मध्ये याबाबत संशोधन करण्यास केंद्र सरकारने सांगितले होते.
- अॉक्टोबर २०२० मधे 2-DGच्या चाचण्या सुरू झाल्या आणि सुमारे ७ महिन्यांनी औषध बाजारात येत आहे.
- हे औषध DRDO अर्थात भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने तयार केले आहे.
- यामुळे कोरोना रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल.
- सध्या 2-DGच्या १० हजार मात्रा तयार असून सोमवारी याचे लोकार्पण करण्यात आले आहे.
- या औषधामुळे भारताचे औषध निर्मितीच्या अब्जावधी डॉलर्सच्या बाजारातील विदेशी कंपनीवरील परावलंबित्व कमी होईल.