Mother’s Day 2026 Wishes : ‘मदर्स डे’ निमित्त मनात दडलेल्या भावना व्यक्त करा ‘या’ खास शुभेच्छांनी, आणि आईचा दिवस बनवा खास

'मदर्स डे' या खास दिवशी आपल्या आई विषयी मनात दडलेल्या अनेक भावना व्यक्त करण्यासाठी या खास शुभेच्छा नक्की आपल्या आईला पाठवला आणि आईसाठीचं प्रेम व्यक्त करा.... 

Mother’s Day 2026 Wishes : ‘मदर्स डे’ निमित्त मनात दडलेल्या भावना व्यक्त करा ‘या’ खास शुभेच्छांनी, आणि आईचा दिवस बनवा खास

देव सर्वत्र पोहचू शकत नाही म्हणून त्याने 'आई' बनवली असं म्हटलं जात. भारतीय संस्कृतीत मातृत्व आणि आई यांना परमेश्वराचा दर्जा दिला आहे. याच मातृत्वाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी खास दिवस म्हणजेच 'मदर्स डे'… अ‍ॅना जार्विस या कन्येने आपल्या आईच्या सन्मानार्थ केली. यानंतर 'मदर्स डे' साजरा करण्याची सुरुवात 1914 पासून झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी अधिकृत मान्यता दिल्यानंतर जगात 1914 पासून मातृदिन साजरा करण्यास सुरुवात झाली. यावर्षी  'मदर्स डे' 10 मे 2026 रोजी साजरा होत आहे. संयम आणि परिपक्वता आई आणि मुलाचे नाते अधिक घट्ट आणि अर्थपूर्ण बनवते. मदर्स डे हा फक्त शुभेच्छांचा दिवस नसून आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा खास क्षण असतो. या खास दिवशी आपल्या आई विषयी मनात दडलेल्या अनेक भावना व्यक्त करण्यासाठी या खास शुभेच्छा नक्की आपल्या आईला पाठवला आणि आईसाठीचं प्रेम व्यक्त करा…. 

"आई नावाची वाटते देवालाही नवलाई,
विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वत:ला विठाई
मातृ दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

आई असेल सोबतीला तर विष सुद्धा अमृत होईल
आई नसेल सोबतीला तर सावलीत सुद्धा चटके देईल
मातृ दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

तुझ्यामुळे जन्म माझा
पाहिले हे जग मी
कसे हे फेडू ऋण तुझे
असंख्य जन्माचा कृतज्ञ मी
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

'स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी' 
निस्वार्थ प्रेम आणि 
त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या आईला 
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!​

आई म्हणजे ईश्वराचे दुसरे रूप, 
जिच्या चरणांशी स्वर्ग वसतो…
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई म्हणजे ईश्वराचे दुसरे रूप 
आणि वात्सल्याचा अखंड झरा
माझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटात 
ढाल बनून उभी राहिलेल्या माझ्या आईला 
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number