Mumbai Tourism : कोण म्हणतं फिरण्यासाठी खूप पैसे लागतात? मुंबईतल्या या ठिकाणी तुम्ही ‘शून्य’ रुपयांत फिरू शकता!

तुम्ही कधी मुंबईला गेलात तर, इथला समुद्र, सनसेट आणि निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी 'या' 5 ठिकाणांना नक्की भेट द्या.
Mumbai Tourism : कोण म्हणतं फिरण्यासाठी खूप पैसे लागतात? मुंबईतल्या या ठिकाणी तुम्ही ‘शून्य’ रुपयांत फिरू शकता!

मुंबई : मुंबईबाहेर राहणाऱ्यांना आणि मुंबई फारशी कधी न पाहिलेल्यांना फिरण्याची खूप इच्छा असते. तसेच, मुंबईत राहणारेही सुट्टीच्या दिवशी थोडंसं निवांत होण्यासाठी जवळपास कुठेतरी जवळच फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करतात. अशा लोकांना फिरण्यासाठी आम्ही मुंबईतली काही अशी ठिकाणं सुचवत आहोत, जिथे ते अगदी कमी खर्चात किंवा अगदजी शून्य रुपयांत सुद्धा फिरू शकतात.

तुम्ही कधी मुंबईला गेलात तर, इथला समुद्र, सनसेट आणि निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी 'या' 5 ठिकाणांना नक्की भेट द्या. प्रवासाचा खर्च, खाणे-पिणे आणि खरेदीचा खर्च वगळता, मुंबईत अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे तुम्ही एक रुपयाही खर्च न करता सुंदर आणि मनोरंजक अनुभव घेऊ शकता. चला, जाणून घेऊया अशी काही खास ठिकाणं!

1. मरीन ड्राईव्ह
समुद्र, सनसेट आणि शांतता एकाच वेळी अनुभवायची असेल, तर मरीन ड्राईव्ह ला नक्की भेट द्या. रात्रीच्या वेळी 'राणीचा हार' म्हणून ओळखला जाणारा हा किनारा दिव्यांनी उजळून निघतो आणि त्याचे सौंदर्य मनमोहक असते. तुम्ही वरळी सीलिंक, गिरगाव किंवा जुहू चौपाटीला जाऊनही असाच अनुभव घेऊ शकता. तुमच्या खास व्यक्तीसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी ही ठिकाणे उत्तम आहेत.

हेही वाचा – Kaas Plateau Electric Tourist Transport : कास पठारावर लवकरच धावणार इलेक्ट्रिक वाहने; पर्यटकांना मिळणार विशेष सेवा

2. सीएसटी स्टेशन (CST Station)
जर तुम्हाला ऐतिहासिक वास्तूंमध्ये रस असेल, तर मुंबईतील सर्वात जुन्या आणि उत्कृष्ट स्थापत्यकलेचा नमुना असलेल्या सीएसटी स्टेशनला भेट द्या. व्हिक्टोरियन गोथिक आणि पारंपारिक भारतीय स्थापत्यशैलीचा संगम इथे पाहायला मिळतो. इथे फिरण्यासाठी कोणताही खर्च येत नाही, पण तरीही तुम्हाला एक खास अनुभव मिळेल.

3. कफ परेड येथे सायकलिंग
सायकलिंगची आवड असलेल्यांसाठी कफ परेड हा एक उत्तम पर्याय आहे. इथे तुम्ही तुमच्या सायकलवर स्वार होऊन सिनेमॅटिक दृश्यांचा अनुभव घेऊ शकता. सकाळी किंवा संध्याकाळी शांत वातावरणात सायकल चालवताना तुम्हाला मुंबईची वेगळीच बाजू पाहायला मिळेल.

4. हँगिंग गार्डन
तुमच्या जोडीदारासोबत शांत आणि रोमँटिक वेळ घालवण्यासाठी हँगिंग गार्डन एक सुंदर ठिकाण आहे. मलाबार हिलवर असलेले हे उद्यान शहराच्या गजबजाटातून दूर, एका शांत कोपऱ्याचा अनुभव देते. इथे तुम्ही विनाशुल्क हिरव्यागार बागेचा आणि समुद्राचा विहंगम नजारा पाहू शकता.

5. छोटा काश्मीर
तुम्हाला काश्मीरला जायचं आहे, पण बजेट नाहीये? काळजी करू नका, मुंबईतच तुम्हाला 'छोटा काश्मीर'चा अनुभव घेता येईल. आरे कॉलनीजवळ असलेल्या या ठिकाणी तुम्ही तलावाजवळ शांत वेळ घालवू शकता. बोटिंगसाठी पैसे द्यावे लागतील, पण निसर्गाच्या सानिध्यात फिरायला आणि शांत बसण्यासाठी इथे कोणताही खर्च नाही.

हेही वाचा – Tourism in Maharashtra : फिरण्याचा सिझन सुरू होतोय; ही आहेत महाराष्ट्रातली टॉप हिल स्टेशन्स

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version