महाराष्ट्रात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट

महाराष्ट्रात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट

यंदा उष्णतेच्या लाटेने एप्रिल महिन्यातील रेकॉर्ड मोडले आहेत. दरम्यान, राज्यात पुढील दोन दिवस म्हणजेच उष्णतेची लाट येणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, २ मेपासून मुंबईसह अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहिल तसेच हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये सर्वाधिक उष्णतेच्या झळी कोसळल्या. यावेळी तेथील तापमान ४६.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले होते. तसेच दुसरीकडे महाराष्ट्रातील हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार बहुतांश शहरांमध्ये मध्यम श्रेणीत उष्णता नोंदवण्यात आली.

शनिवारी तापमान किती असेल?


  • मुंबईत कमाल तापमान ३४ आणि किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

  • पुण्यात कमाल तापमान ४० आणि किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

  • नागपुरात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

  • नाशिकमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

  • औरंगाबादमध्ये कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version