Blue Turmeric Health Benefits : निळ्या हळदीची जगभरात चर्चा; गुणधर्म आणि फायदे काय? Priyanka Gandhi यांनी दिली मोदींना माहिती

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी त्यांच्या आहारातील या अनोख्या पदार्थाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती दिली तेव्हा पंतप्रधानांनीही कुतूहलाने त्याबद्दल विचारपूस केली.
Blue Turmeric Health Benefits : निळ्या हळदीची जगभरात चर्चा; गुणधर्म आणि फायदे काय? Priyanka Gandhi यांनी दिली मोदींना माहिती

Priyanka Gandhi Blue Turmeric Secret : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभाध्यक्षांनी आयोजित केलेल्या एका अनौपचारिक बैठकीत 'निळी हळद' (Blue Turmeric) हा विषय चांगलाच चर्चेत आला. काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी त्यांच्या आहारातील या अनोख्या पदार्थाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती दिली तेव्हा पंतप्रधानांनीही कुतूहलाने त्याबद्दल विचारपूस केली. प्रदूषणापासून ते कर्करोगापर्यंत अनेक आजारांवर गुणकारी मानली जाणारी ही हळद नक्की काय आहे, हे प्रियांका गांधींनी स्पष्ट केले.

प्रियांका गांधींच्या निळ्या हळदीचे 'वायनाड' कनेक्शन
प्रियांका गांधी यांनी सांगितले की, त्या दररोज निळ्या हळदीचे सेवन करतात. विशेषतः प्रदूषणाचे दुष्परिणाम, घशातील खवखव आणि विविध प्रकारच्या ॲलर्जींपासून संरक्षण मिळवण्यासाठी ही हळद अत्यंत प्रभावी आहे. ही दुर्मिळ हळद प्रामुख्याने प्रियांका गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या 'वायनाड' च्या (केरळ) मातीत उगवते. याशिवाय ईशान्य भारत आणि मध्य प्रदेशातील काही भागातही याचे उत्पादन घेतले जाते.

सामान्य हळदीपेक्षा वेगळी कशी?
नाव आणि स्वरूप: याला शास्त्रीय भाषेत 'करकुमा कैसिया' (Curcuma Caesia) किंवा 'काळी हळद' असेही म्हणतात. ही बाहेरून तपकिरी पण आतून गडद निळी किंवा जांभळ्या रंगाची असते.
वैशिष्ट्ये: यामध्ये करक्यूमिनचे प्रमाण पिवळ्या हळदीपेक्षा कितीतरी जास्त असते आणि याचा सुगंध कापरासारखा येतो.
दुर्मिळता: ही हळद सहजासहजी उपलब्ध होणे कठीण असल्याने ती पिवळ्या हळदीपेक्षा महाग असते.

हेही वाचा – Cold-Cough Home remdies: खोकला गेल्यानंतरही छातीत जडपणा वाटतोय? ही छोटीशी वस्तू तुमच्यासाठी ठरेल वरदान

आरोग्यासाठी वरदान: तज्ज्ञांचे मत
निळ्या हळदीवर झालेल्या विविध संशोधनांनुसार, यामध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात.
कर्करोग प्रतिबंध: एम्समधील (AIIMS) तज्ज्ञांच्या मते, यातील उच्च करक्यूमिनमुळे ती 'अँटी-कॅन्सर' मानली जाते. प्रयोगशाळेतील अभ्यासात असे दिसून आले आहे की ही हळद कॅन्सर पेशींची वाढ रोखण्यास मदत करते.
संधिवात आणि सूज: आयुर्वेद तज्ज्ञांनुसार, गुडघेदुखी किंवा सांधेदुखीमध्ये याचा लेप किंवा सेवन अत्यंत गुणकारी ठरते.
फुफ्फुसांचे आरोग्य: वाढत्या प्रदूषणाच्या काळात फुफ्फुस आणि घसा मजबूत ठेवण्यासाठी हे एक उत्तम नैसर्गिक कवच आहे.

वापर कसा करावा?
– निळ्या हळदीचा फायदा घेण्यासाठी खालील पद्धतींचा अवलंब करता येतो:
– दररोज 1/2 ते 1 चमचा हळद पावडर दूध किंवा पाण्यात मिसळून घेता येते.
– चहामध्ये टाकूनही याचे सेवन शक्य आहे.
– सांधेदुखीसाठी या हळदीचा पेस्ट स्वरूपात लेप लावता येतो.
– कोशिंबीर किंवा भाज्यांमध्येही याचा वापर करता येतो.

हेही वाचा – PM Narendra Modi: "2025 हे अभिमान, एकता आणि शौर्याचे वर्ष" नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर पंतप्रधान मोदींचे देशाला संबोधन

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version