विधानसभा निवडणूक २०२२ : पाच राज्यांतील निवडणुकीची रणधुमाळी सुरू

विधानसभा निवडणूक २०२२ : पाच राज्यांतील निवडणुकीची रणधुमाळी सुरू

देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणुका टप्प्यांमध्ये घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. दरम्यान उत्तर प्रदेशासह पाच राज्यातील निवडणुकीची मतमोजणी १० मार्च रोजी होणार आहे.

गोवा, मणिपुर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका पार पडणार असून ६९० विधानसभा जागांवर मतदान पार पडणार आहे. मात्र कोरोना काळात निवडणुका घेणे हे आव्हानात्मक असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करतच निवडणुका होणार असल्याचे  निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५ जानेवारीपर्यंत रोड शो, पदयात्रा, प्रचार यात्रा काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर १० फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडणार असून १० मार्च रोजी या पाचही राज्यांचा निकाल जाहीर होणार आहे.

असे होणार मतदान…

पंजाब, गोवा, उत्तराखंड – १४ फेब्रुवारी

मणिपूर

  • पहिला टप्पा  – २७ फेब्रुवार
  • दुसरा टप्पा   – ३ मार्च

उत्तर प्रदेश

  • पहिला टप्पा   – १० फेब्रुवारी
  • दुसरा टप्पा    – १४ फेब्रुवारी
  • तिसरा टप्पा   – २० फेब्रुवारी
  • चौथा टप्पा     – २३ फेब्रुवारी
  • पाचवा टप्पा  – २७ फेब्रुवारी
  • सहावा टप्पा  – ०३ मार्च
  • सातवा टप्पा  – ०७ मार्च

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version