RBI Repo Rate: पुढील 5 दिवसांत गृहकर्ज स्वस्त होणार? RBI कडून रेपो दरात कपातीची शक्यता

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची चलनविषयक धोरण समिती (MPC) 3 ते 5 डिसेंबर दरम्यान बैठक घेणार असून, 5 डिसेंबरला गव्हर्नर संजय मल्होत्रा अंतिम निर्णय जाहीर करतील.
RBI Repo Rate: पुढील 5 दिवसांत गृहकर्ज स्वस्त होणार? RBI कडून रेपो दरात कपातीची शक्यता

RBI Repo Rate: देशभरातील सामान्य नागरिकांसाठी, विशेषतः घर किंवा वाहन खरेदीची योजना आखणाऱ्यांसाठी पुढील काही दिवस निर्णायक ठरणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची चलनविषयक धोरण समिती (MPC) 3 ते 5 डिसेंबर दरम्यान बैठक घेणार असून, 5 डिसेंबरला गव्हर्नर संजय मल्होत्रा अंतिम निर्णय जाहीर करतील. या बैठकीत रेपो दरात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

25 बेसिस पॉइंट्स कपातीची शक्यता

बाजारातील तज्ञांचा अंदाज आहे की, RBI पुन्हा व्याजदर कमी करण्याच्या भूमिकेत दिसू शकते. रेपो दरात किमान 25 बेसीस पॉईंटने कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाल्यास रेपो दर 5.50 टक्के वरून 5.25 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो. तथापि, काही अर्थतज्ज्ञ याबाबत सावध भूमिका घेत आहेत. दुसऱ्या तिमाहीतील 8.2 टक्के GDP वाढ पाहता RBI व्याजदर स्थिर ठेवण्याचाही निर्णय घेऊ शकते, असे मतही काही तज्ञांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा – Railway Special Service: स्लीपर कोचमधील प्रवाशांसाठी रेल्वेची मोठी घोषणा! फक्त 20 ते 50 रुपयांमध्ये मिळणार बेडशीट आणि उशी

RBI कडून दिलासा मिळू शकतो?

गेल्या दोन महिन्यांपासून किरकोळ महागाई (CPI) सरकारने ठरवलेल्या 2 टक्क्यांच्या किमान मर्यादेपेक्षा खाली कायम आहे. ऑक्टोबर मध्ये महागाईने विक्रमी नीचांकी पातळी गाठली. यामागे स्वस्त अन्नधान्य, GST कपात आणि पुरवठा साखळी सुधारणा हे प्रमुख कारण ठरले. महागाई नियंत्रणात असल्यामुळे मध्यवर्ती बँकेवर दरकपातीचा दबाव वाढला आहे. गेल्या वर्षी फेब्रूवारीमध्ये RBI ने व्याजदर कपातीचे चक्र सुरू केले होते. तेव्हापासून रेपो दरात 100 बेसीस पॉईंटची घट करण्यात आली आहे.

हेही वाचा – Income Tax Return : तुम्ही ITR भरताना ही चूक तर केली नाही ना? 'डिजिटल ट्रॅकिंग'मुळे छोटीशी चूकही पडू शकते महागात

EMI कमी होणार? गृहकर्ज आणि कार कर्ज होऊ शकते अधिक स्वस्त

रेपो दरात कपात झाल्यामुळे, बँका आरबीआयकडून कमी व्याजदराने कर्ज घेऊ शकतील. बँका या स्वस्त कर्जाचे फायदे त्यांच्या ग्राहकांना देखील देतात. रेपो दरात घट झाल्यानंतर, बँका सामान्यतः कर्जांवरील व्याजदर कमी करतात, ज्यामुळे सामान्य नागरिकांसाठी कर्जे स्वस्त होतात. नवीन व्याजदरानुसार गृहकर्ज ईएमआय कमी होतील आणि नवीन कर्जे देखील कमी व्याजदराने उपलब्ध होतील.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version