What is Zoho: ‘झोहो’ देणार मायक्रोसॉफ्ट आणि गुगलला टक्कर; काय आहेत या स्वदेशी प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्ये? जाणून घ्या

मंत्री वैष्णव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना लिहिले, 'मी आता झोहोवर स्विच करत आहे. कागदपत्रे, स्प्रेडशीट आणि सादरीकरणे तयार करण्यासाठी हे आपलेच स्वदेशी व्यासपीठ आहे.'
What is Zoho: ‘झोहो’ देणार मायक्रोसॉफ्ट आणि गुगलला टक्कर; काय आहेत या स्वदेशी प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्ये? जाणून घ्या

What is Zoho: भारतातील स्वदेशी तंत्रज्ञान आणि उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी मायक्रोसॉफ्टसारख्या परदेशी साधनांऐवजी झोहो (Zoho) प्लॅटफॉर्म वापरण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री वैष्णव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना लिहिले, ‘मी आता झोहोवर स्विच करत आहे. कागदपत्रे, स्प्रेडशीट आणि सादरीकरणे तयार करण्यासाठी हे आपलेच स्वदेशी व्यासपीठ आहे. मी सर्वांना पंतप्रधान मोदींच्या आवाहनात सामील होऊन स्वदेशी उत्पादने आणि सेवा स्वीकारण्याचे आवाहन करतो.’

झोहो म्हणजे काय?

झोहो हे चेन्नईस्थित भारतीय तंत्रज्ञान कंपनीचे उत्पादन आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा गूगल वर्कस्पेसप्रमाणेच यामध्ये डॉक्युमेंट्स, स्प्रेडशीट्स आणि प्रेझेंटेशन्स तयार करता येतात. तसेच, Zoho CRM, Zoho Mail, Zoho Books आणि Zoho Projects सारखी क्लाउड-आधारित व्यावसायिक साधने लहान-मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. परवडणाऱ्या किमतीमुळे हे सॉफ्टवेअर भारतीय कंपन्यांसाठी एक विश्वासार्ह पर्याय बनले आहे.

हेही वाचा – Mobile Back Cover: स्मार्टफोनला कव्हर लावल्याने निर्माण होतोय मोठा धोका;जाणून घ्या

झोहो संस्थापकांची प्रतिक्रिया

झोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी मंत्री वैष्णव यांचे आभार मानले. त्यांनी म्हटलं, ‘धन्यवाद सर! गेली दोन दशके आमचे अभियंते या उत्पादन संचावर सातत्याने काम करत आहेत. हे आमच्यासाठी मोठे मनोबल वाढवणारे आहे. आम्ही देशाचा अभिमान वाढवत राहू. जय हिंद!’ 

हेही वाचा – Apple iPhone 17 Air : नव्या फोनच्या कॅमेरात ‘बग’; फोटोमध्ये येतोय काळा भाग आणि पांढऱ्या रेषा

सोशल मीडियावर उमटलेल्या प्रतिक्रिया

वैष्णव यांच्या या निर्णयाने ट्विटर/X वर मोठी चर्चा रंगली आहे. परीक्षित साहा यांनी लिहिले, मी झोहो बुक्स आणि पेरोल एक वर्षापेक्षा जास्त काळ वापरत आहे. भारतीय असल्यामुळे नाही तर गुणवत्ता पाहून मी सबस्क्राइब केले आहे. तथापी, कार्तिकेय यांनी मत व्यक्त केले की, झोहो उद्योगांसाठीच नाही तर ग्राहकांसाठी देखील पसंतीचा प्लॅटफॉर्म ठरू शकतो. आयटी मंत्र्यांच्या या निर्णयामुळे मेक इन इंडिया उपक्रमाला बळकटी मिळाली आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version