Bank Deposit : महिलेची उडाली झोप! गॅस सबसिडीच्या 300 रुपयांऐवजी खात्यात 100 कोटी जमा; नेमकं प्रकरण काय?

पासबुकवरील शेवटचे जमा झालेले क्रेडिट पाहून ही महिला आणि बँक अधिकारी दोघेही अवाक झाले.
Bank Deposit : महिलेची उडाली झोप! गॅस सबसिडीच्या 300 रुपयांऐवजी खात्यात 100 कोटी जमा; नेमकं प्रकरण काय?

West Bengal LPG Subsidy Bank Error : पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील कुलतली जामताला येथील पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) शाखेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 36 वर्षीय काश्मिरा शेख या नेहमीप्रमाणे आपल्या एलपीजी गॅस सिलिंडरची सबसिडी जमा झाली आहे की नाही, हे पाहण्यासाठी बँकेत गेल्या होत्या. मात्र, पासबुकवरील शेवटचे जमा झालेले क्रेडिट पाहून त्या आणि बँक अधिकारी दोघेही अवाक झाले. त्यांच्या खात्यात 99,99,99,९९७ रुपये (100 कोटींपेक्षा अवघे ३ रुपये कमी) जमा झाल्याची नोंद दाखवत होती.

हातकाम आणि बॅग शिवून चालतो संसार; बँक खात्यावर लागली टाच
एस्बेस्टसच्या छताच्या घरात राहणाऱ्या काश्मिरा स्वतः जरी-कढाईचे काम करतात, तर त्यांचे पती कोलकाता येथे बॅग शिवण्याचे काम करतात. अतिशय सामान्य परिस्थिती असलेल्या या कुटुंबाचे जीवन या अनाकलनीय रकमेमुळे पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या प्रकरणानंतर बँकेने चौकशी सुरू करत काश्मिरा यांचे एकमेव बँक खाते तात्काळ गोठवले (फ्रीझ केले) आहे. त्यामुळे दैनंदिन गरजांसाठी लागणारे पैसेही काढता येत नसल्याने हे कुटुंब प्रचंड अडचणीत आणि भीतीच्या छायेखाली आले आहे.

हेही वाचा – Fire In Train Engine : फलाटावर लागताच रेल्वे इंजिनला भीषण आग, जीव वाचण्यासाठी प्रवाशांच्या डब्यांमधून उड्या; गाडी पूर्णपणे जळून खाक

सर्व्हरमधील बिघाड की तांत्रिक त्रुटी? चौकशी सुरू
एकाच रात्रीत गरिबाच्या खात्यात एवढी मोठी रक्कम कशी जमा झाली, यावरून सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. काही सूत्रांनुसार, पश्चिम बंगालमधील बँकिंग व्यवहारांवर परिणाम करणाऱ्या सर्व्हरमधील संभाव्य तांत्रिक बिघाडामुळे (Server Malfunction) हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पीएनबी प्रशासनाकडून या प्रकरणाचा सखोल आढावा घेतला जात असून अद्याप बँकेचे कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

महिलेची पतीसह पोलिसांत धाव; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
आपल्या खात्यात जमा झालेल्या या अफाट रकमेमुळे घाबरलेल्या काश्मिरा आणि त्यांच्या पतीने कुलतली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. 'आम्ही मेहनतीने पोट भरणारे गरीब लोक आहोत, आमच्या खात्यात इतका पैसा कसा आला हे आम्हाला माहिती नाही,' असे या सर्व प्रकारामुळे तणावात आलेल्या जोडप्याचे म्हणणे आहे. केवळ कुलतलीमध्येच नव्हे, तर बंगालच्या इतर भागातही अचानक खात्यांत मोठ्या रकमा जमा होण्याच्या काही घटना समोर आल्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

हेही वाचा – Chaiwala'z Founder Rohit Sharma: तरुण उद्योजकाच्या निधनाने खळबळ; 'चायवालाज'चे संस्थापक रोहित शर्मा यांनी उचललं टोकाचं पाऊल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version