America Nuclear Test : ट्रम्प यांच्या ‘अणुचाचणी’च्या घोषणेनंतर खळबळ; ऊर्जा सचिवांनी केला खुलासा, ‘म्हणाले, आम्ही तर..’

ट्रम्प यांच्या अणुचाचणीच्या आदेशामुळे जगात मोठी खळबळ उडाली आणि अमेरिका खरोखर अण्वस्त्रांची चाचणी करणार का, असा प्रश्न जगभरात उपस्थित झाला. तसेच, याच्या परिणामांविषयी चर्चा सुरू झाली.
America Nuclear Test : ट्रम्प यांच्या ‘अणुचाचणी’च्या घोषणेनंतर खळबळ; ऊर्जा सचिवांनी केला खुलासा, ‘म्हणाले, आम्ही तर..’

America Nuclear Test : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी नुकतीच एक मोठी आणि अचानक घोषणा करत अमेरिकेच्या संरक्षण विभागाला (पेंटॅगॉन) तात्काळ अण्वस्त्र चाचणी (Nuclear Weapon Test) पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी 'ट्रुथ' सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करून याबद्दल माहिती दिली होती. ट्रम्प यांच्या या आदेशामुळे जगात मोठी खळबळ उडाली आणि अमेरिका खरोखर अण्वस्त्रांची चाचणी करणार का, असा प्रश्न जगभरात उपस्थित झाला. तसेच, याच्या परिणामांविषयी चर्चा सुरू झाली.

ऊर्जा सचिवांचा महत्त्वाचा खुलासा
या सर्व घडामोडींवर आता अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट (Chris Wright) यांनी खुलासा केला आहे. अमेरिकेची अण्वस्त्रांचा स्फोट (Nuclear Explosion) असलेली चाचणी करण्याची कोणतीही योजना नसल्याचं ख्रिस राईट यांनी स्पष्ट केलं आहे. या संदर्भातील वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

ख्रिस राईट यांनी नेमके काय सांगितले
'नॉन-क्रिटिकल स्फोट': "डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेले आदेश हे अण्वस्त्रांच्या स्फोटाच्या संदर्भातील नाहीत. ज्या चाचण्यांचे आदेश दिले आहेत, त्या चाचणीत अण्वस्त्र स्फोटांचा समावेश नसून त्याऐवजी इतर भागांवर लक्ष केंद्रित करण्याच्या संदर्भातील आहेत."
'सिस्टम चाचण्या': "मला वाटतं की आपण सध्या ज्या चाचण्यांबद्दल बोलत आहोत, त्या 'सिस्टम चाचण्या' आहेत. हे अण्वस्त्र स्फोट नाहीत. हे असे आहेत, ज्यांना आपण 'नॉन-क्रिटिकल स्फोट' म्हणतो."

हेही वाचा – अमेरिकेचा वर्क व्हिसा किंवा ग्रीन कार्ड मिळविण्यासाठी आता द्यावा लागणार DNA नमुना? ट्रम्प सरकारचा नवा प्रस्ताव चर्चेत

ट्रम्प यांनी काय आदेश दिले होते?
डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ'वरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, "अमेरिकेकडे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत आणि हे माझ्या पहिल्या कार्यकाळात शस्त्रांचं संपूर्ण अद्ययावतीकरण आणि नूतनीकरण यासह साध्य झालं."
स्पर्धक देशांना उत्तर: ट्रम्प यांनी म्हटले होते की, "प्रचंड विध्वंसक शक्तीमुळे मला त्या चाचण्या करणं आवडत नाही. पण पर्याय नव्हता! रशिया दुसऱ्या आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण 5 वर्षांच्या आतच ते समान पातळीवर येतील." "इतर देशांच्या चाचणी कार्यक्रमांमुळे मी युद्ध विभागाला (Department of War) समान आधारावर आमच्या अण्वस्त्रांची चाचणी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. ती प्रक्रिया त्वरित सुरू होईल."

ट्रम्प यांच्या या आदेशांनी जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण केले होते, मात्र आता ऊर्जा सचिवांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे अमेरिकेची अण्वस्त्र स्फोटाची योजना नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – 'ख्रिश्चनांवरील हल्ले थांबवा नाहीतर परिणाम भोगा…'; अमेरिकेचा नायजेरियाला कठोर इशारा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version