ट्रम्प यांचं ‘टॅरिफ कार्ड’ अमेरिकेवरच उलटलं? अर्थव्यवस्थेत तीन वर्षांत प्रथमच मोठी घट..

अमेरिकेचा जीडीपी अहवाल जाहीर झाल्यानंतर तिथल्या शेअर बाजारातही घट झाली. गेल्या कित्येक महिन्यांपासून ट्रम्प सरकारच्या टॅरिफ धोरण आणि चीनबसोबतच्या व्यापार युद्धामुळे जगातील अनिश्चितता वाढली आहे.
ट्रम्प यांचं ‘टॅरिफ कार्ड’ अमेरिकेवरच उलटलं? अर्थव्यवस्थेत तीन वर्षांत प्रथमच मोठी घट..

नवी दिल्ली : अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. पण पहिल्या तिमाहीत यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत मागील तीन वर्षांच्या तुलनेत प्रथमच एवढी घट झाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांत अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत.

पहिल्या तिमाहीत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची 0.3 टक्क्यांनी घट झाली. तीन वर्षांत ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा एवढी घट नोंदविली गेली. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरण हे यामागचे कारण असल्याचे म्हटले जात आहे. वाणिज्य विभागाच्या ब्युरो ऑफ इकॉनॉमिक अॅनालिसिसच्या (Bureau of Economic Analysis) मते, शेवटच्या तिमाहीत जीडीपी 0.3 टक्क्यांनी घटली. आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, रेकॉर्ड आयातीमुळे मार्चमध्ये वस्तूंच्या व्यापार तूटीत मोठी वाढ झाली आहे. बर्‍याच अर्थशास्त्रज्ञांनी यावरून त्यांचे जीडीपी अंदाज कमी नोंदवले आहेत. चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्था 2.4%दराने वाढली. या अहवालात ट्रम्प यांच्या पहिल्या 100 दिवसीय कार्यकाळात त्यांनी लागू केलेल्या आर्थिक धोरणांबद्दल अमेरिकन लोकांच्यात असलेला रागही यातून दिसून येतो. पुढील काळात अधिक खर्च टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वस्तू आयात केल्यामुळे त्याचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. 

हेही वाचा – 'या' आहेत पाकिस्तानी सैन्याच्या बहुचर्चित कमकुवत बाजू; तंदुरुस्तीवरही प्रश्नचिन्ह..

जीडीपीचा अहवाल जाहीर झाल्यानंतर अमेरिकेच्या शेअर बाजारातही घट झाली. गेल्या कित्येक महिन्यांपासून ट्रम्प सरकारच्या टॅरिफ धोरणामुळे जगातील अनिश्चितता वाढली आहे. तसेच, चीनबरोबर व्यापार युद्ध देखील त्याच्या शिखरावर आहे. बहुतेक अर्थशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, ट्रम्प जागतिक व्यापारात (global trade) बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यामुळे अमेरिकेत महागाई वाढण्याची आणि मंदी येण्याची अपेक्षा आहे. सलग दोन तिमाहीत अर्थव्यवस्थेत घट झाल्यास त्या स्थितीला मंदी म्हणतात. तथापि, राष्ट्रपतींनी ही भीती नाकारली आहे. ते म्हणतात की, अमेरिका पुन्हा भरभराट होईल. परंतु, यासाठी आम्हाला बायडेन यांच्या हँगओव्हरमधून बाहेर पडावे लागेल.

आयातीमध्ये मोठी तेजी
बुधवारी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहिले की, याला थोडा वेळ लागेल. त्याचा टॅरिफशी काही संबंध नाही. आम्हाला हे बायडेन यांच्याकडून कडून मिळाले. पण आम्ही पुन्हा भरभराट करू. संयम ठेवा, आपल्याला टक्कर देणारे कोणीही नसेल. पहिल्या तिमाहीत अमेरिकेच्या आयातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ट्रम्प यांचे पुढील काळात वाढीव लागू होणारे टॅरिफ दर टाळण्यासाठी अमेरिकन कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात आयात केली. मागील वर्षाच्या चौथ्या तिमाहीत आयात 1.9 टक्क्यांनी घटली होती. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ती 41.3 टक्क्यांनी वाढली आहे. या कालावधीत निर्यातीत 1.8 टक्क्यांची नगण्य प्रमाणात वाढ झाली आहे.

हेही वाचा – जगातील सर्वांत महागडं विमानतळ, इथे एका केळाची किंमत आहे 500 रुपये! गगनाला भिडलेत दर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version