Unclaimed Money In India: देशभरात 80,000 कोटी रुपये बेवारस! कोणाचा आहे हा पैसा?

बँका, विमा कंपन्या आणि म्युच्युअल फंडांमध्ये ठेवलेले हे पैसे त्यांच्या मालकांच्या निधनानंतर किंवा माहितीअभावी अडकून पडले आहेत.
Unclaimed Money In India: देशभरात 80,000 कोटी रुपये बेवारस! कोणाचा आहे हा पैसा?

Unclaimed Money In India: देशभरात तब्बल 80,000 कोटी रुपये असे आहेत, ज्यांचा कोणताही मालक समोर आलेला नाही. बँका, विमा कंपन्या आणि म्युच्युअल फंडांमध्ये ठेवलेले हे पैसे त्यांच्या मालकांच्या निधनानंतर किंवा माहितीअभावी अडकून पडले आहेत. सेबी-नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार अभिषेक कुमार यांनी या धक्कादायक आकडेवारीची माहिती सोशल मीडियावर दिली. त्यांनी सांगितले की, “अनेक कुटुंबांना कल्पनाच नसते की त्यांच्या सदस्यांनी बँक खातं, विमा पॉलिसी किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली होती. परिणामी, हे पैसे वर्षानुवर्षे निष्क्रिय राहतात.”

हेही वाचा – Indian Stock Market: भारतीय शेअर बाजारात तेजीची लाट, निफ्टी-सेंसेक्स वाढले; बिहार एक्झिट पोल्स आणि व्यापार चर्चांचा परिणाम

माहितीचा अभाव आणि निष्काळजीपणा जबाबदार

तज्ज्ञांच्या मते, हे पैसे अडकण्याचे प्रमुख कारण म्हणजे संवादाचा अभाव आणि दस्तऐवजांची अपूर्णता. अनेक वेळा खात्यांमध्ये नामनिर्देशन (Nominee) केले जात नाही किंवा आवश्यक कागदपत्रे पूर्ण होत नाहीत. त्यामुळे व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबाला त्या पैशांचा मागोवा घेता येत नाही.

हेही वाचा – ITR Refund 2025: उशिरा देण्यात येणाऱ्या आयकर परताव्यावर व्याज मिळते का? काय आहे आयकर विभागाचा नियम?

कायदेशीर मृत्युपत्र आवश्यक

अभिषेक कुमार यांच्या मते, फक्त साधं इच्छापत्र तयार करणं पुरेसं नसतं. कायदेशीर पद्धतीने तयार केलेले मृत्युपत्र, त्यासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र आणि स्वाक्षरीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग यामुळे वारसांना पुढे अडचणी येत नाहीत. त्यांनी सल्ला दिला की प्रत्येकाने आपल्या गुंतवणुकीची माहिती कुटुंबीयांसोबत शेअर करावी आणि कागदपत्रे व्यवस्थित ठेवावीत.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version