बांगलादेशच्या पंतप्रधानांनी मानले मोदींचे आभार

रशिया-युक्रेन युद्धाचा आज चौदावा दिवस आहे. रशियाची युक्रेनवर तीव्र चढाई सुरू आहे. दरम्यान, या युद्धात अनेक भारतीय नागरिक अडकले होते. त्यामुळे त्यांना मायदेशी सुखरुप आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा मोहिमेतर्गत अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणले. तसेच बांगलादेशातील नऊ नागरिकांना सुखरुप बाहेर काढल्यामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान […]

बांगलादेशच्या पंतप्रधानांनी मानले मोदींचे आभार

रशिया-युक्रेन युद्धाचा आज चौदावा दिवस आहे. रशियाची युक्रेनवर तीव्र चढाई सुरू आहे. दरम्यान, या युद्धात अनेक भारतीय नागरिक अडकले होते. त्यामुळे त्यांना मायदेशी सुखरुप आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा मोहिमेतर्गत अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणले. तसेच बांगलादेशातील नऊ नागरिकांना सुखरुप बाहेर काढल्यामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत युक्रेनमधून आपल्या ९ नागरिकांची सुटका केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. या कारवाईत नेपाळी, ट्युनिशियाच्या विद्यार्थ्यांचीही सुटका करण्यात आली.

भारतीय विद्यार्थी युक्रेन सैन्यात सामील

भारतातील तामिळनाडूमधील एक विद्यार्थी रशियाविरोधाती युद्धात लष्करी सैन्यात सामील झाला आहे. साई निकेश रविचंद्रन असे या विद्यार्थ्याचे नाव असून हा विद्यार्थी युक्रेनच्या निमलष्करी दलात सामील झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number