मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात तसेच ठाण्यातील उत्तरसभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली. तसेच राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासंबंधी ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. अशातच उत्तरप्रदेशात ११ हजार भोंग्यां आवाज बंद झाला आहे. तसेच ३५ हजार मंदिर-मशिदींनी आवाजावर बंधने घातली आहेत.
भोंग्याच्या आवाजसंदर्भात अयोध्येमध्ये मंदिरापासून ते लखनऊमधील शिया मशिदींपर्यात भोंगे उतरवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. उत्तर प्रदेशमधील ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्यात आले आहेत. तसेच ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
गेल्या चार दिवसांमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी भोंगे उतरवण्याबाबत तसेच आवाजावर बंधने ठेवण्याबाबत कारवाई केली असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. तसेच राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत भोंग्यांच्या आवाजासंदर्भात कारवाई करण्याचे निर्देश जिल्हास्तरीय प्रशासनाला देण्यात आले. त्यामुळे उत्तरप्रदेशमध्ये भोंग्याविरोधात मोहिम सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली. मात्र, त्याचे पडसाद उत्तर प्रदेशात उमटले असून उत्तरप्रदेशात भोंगे उतरवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.