Sudha Murty Objects Child Influencers on Social Media : प्रसिद्ध टेक व्यावसायिक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि खासदार सुधा मूर्ती यांनी राज्यसभेत (Sudha Murty speaks in Rajya Sabha) बोलताना सोशल मीडियाच्या (Social Media) वाढत्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली. गेल्या काही वर्षांपासून डिजिटल माध्यमांवर (Digital Platform) लहान मुलांचा वावर वाढलेला आहे. अनेक पालक आपल्या मुलांना चाइल्ड इन्फ्लूएन्सर (Child Influencer) बनवण्यासाठी उत्सुक असतात आणि त्यांच्या निरागसतेचा व गोंडस दिसण्याचा वापर करून प्रसिद्धी आणि त्यातून पैसा मिळवण्याचा प्रकार करत आहेत. या ट्रेंडबद्दल सुधा मूर्ती यांनी शून्य प्रहरात हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला.
डिजिटल स्पेसमध्ये व्यापारीकरण रोखण्याची गरज
डिजिटल स्पेसमध्ये लहान मुलांचे वाढते व्यापारीकरणरोखण्यासाठी नियमावली (Guidelines to Stop Commercialisation of Children) असावी, अशी कळकळीची मागणी मूर्ती यांनी केली. त्या म्हणाल्या, “सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी झाला पाहिजे. आईने मुलांना किंवा आईने स्वतःला इन्फ्लूएन्सर बनविण्यासाठी याचा वापर करू नये.” सोशल मीडियावर लहान मुलांना कशाप्रकारे दाखवले जात आहे आणि त्यावर कोणतेही नियम नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तरुण पिढीला चांगली मूल्ये द्यायची असतील, तर सरकारने यासाठी पुढे आले पाहिजे.
VIDEO | Rajya Sabha MP Sudha Murty says, "Government should impose regulations on social media usage of parent-children influencers." (Source: Third Party) (Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/vmHo1IyMmH — Press Trust of India (@PTI_News) December 5, 2025
निरागस मुलांचा पैशांसाठी वापर
सुधा मूर्ती यांनी सोशल मीडियाच्या नकारात्मक बाजू (Negative Side of Social Media) अधोरेखित केली. त्या म्हणाल्या, “अनेक पालक त्यांच्या निरागस मुलांचा वापर पैशांसाठी करतात. या मुलांना ते काय करत आहेत, याची जाणीवही नसते.” मुलांना वेगवेगळे पोशाख घालून, लिप्सिंग करून व्हिडीओ (Children Videos on Social Media) तयार केले जातात. या व्हिडीओतून व्ह्यूज आणि फॉलोअर्स (Views and Followers) मिळतील, त्यातून पैसाही (Money) मिळेल, असा पालकांचा प्रयत्न असतो. आर्थिक मदत होत असली तरी हा प्रकार चांगला नाही, असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा – R. Harshita: नृत्यांगणा हर्षिताचा अनोखा पराक्रम; भरतनाट्यम 8 मिनिटांत चढल्या 574 पायऱ्या
मुलांच्या मनावर दीर्घकाळ परिणाम
सोशल मीडियावरील मुलांचे हे चित्रण दीर्घकाळ त्यांच्या मनावर परिणाम करणारे ठरू शकते, अशी भीती सुधा मूर्ती यांनी व्यक्त केली. ‘पुढे मुलांचे काय होईल? ते आपली निरागसता गमावून बसतील. मुलांना पुढे सामाजिक उपक्रमात भाग घेण्यास अडचणी येतील. क्रीडा (Sports), चांगले शिक्षण (Good Education) कसे घ्यायचे, यात समस्या येऊ शकतात. पालकांसाठी मुले केवळ उत्पन्नाचा स्त्रोत बनून राहतील,’ असेही त्या म्हणाल्या.
धारदार शस्त्रासारखा सोशल मीडिया
सुधा मूर्ती यांनी सोशल मीडियाची तुलना धारदार शस्त्राशी केली. त्या म्हणाल्या, ‘यातून तुम्ही खाण्यासाठी फळे कापू शकता आणि एखाद्याला मारूही शकता.’ त्यामुळे सोशल मीडियासाठी नियमावली तयार करण्यात यावी, अशी कळकळीची विनंती त्यांनी भारत सरकारला केली. सरकारने जाहिराती आणि चित्रपटांमध्ये मुलांचा वापर कसा असावा, याबद्दल कायदे (Laws) केले आहेत आणि त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. याच पद्धतीने सोशल मीडियाबाबतही कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.