Sonam Wangchuk Arrested: लेह हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांना अटक; ‘या’ आरोपाखाली करण्यात आली कारवाई

अटकेपूर्वी वांगचुक यांनी सरकारवर निशाणा साधत, 'माझा तुरुंगवास हा सरकारसाठी माझ्या स्वातंत्र्यापेक्षा अधिक डोकेदुखी ठरेल', अशी प्रतिक्रिया दिली होती.
Sonam Wangchuk Arrested: लेह हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांना अटक; ‘या’ आरोपाखाली करण्यात आली कारवाई

Sonam Wangchuk Arrested: लेह शहराला हादरवून टाकणाऱ्या हिंसाचार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक केली आहे. लेहमध्ये झालेल्या संघर्षात चार तरुणांचा मृत्यू झाला होता तर सुमारे 90 जण जखमी झाले होते. तसेच सार्वजनिक मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अटकेपूर्वी वांगचुक यांनी सरकारवर निशाणा साधत, 'माझा तुरुंगवास हा सरकारसाठी माझ्या स्वातंत्र्यापेक्षा अधिक डोकेदुखी ठरेल', अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा – Supreme Court On Election Commission: निवडणूक आयोगाच्या निर्णयाला विरोध; सर्वोच्च न्यायालयाने दिला चाप, दंडही सुनावला

दरम्यान, गुरुवारी वांगचुक यांच्या एनजीओचा एफसीआरए परवाना रद्द करण्यात आला. तसेच त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लाँड्रिंगचेही आरोप करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या तपासात अनियमिततेचे पुरावे मिळाल्यानंतर परदेशी देणग्यांवर बंदी घालण्यात आली होती. हिंसाचारानंतर लेहमध्ये सलग तिसऱ्या दिवशी कर्फ्यू सुरू आहे. 

हेही वाचा – PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! किसान सन्मान निधीचा हप्ता वाटप सुरू; 3 राज्यांतील 27 लाख लाभार्थ्यांना दिवाळी भेट

गृह मंत्रालयाच्या टीमने सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थानिक प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. दरम्यान, शैक्षणिक संस्थांना दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 50 हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे. कारगिलसह इतर भागांत मोठ्या जमावबंदीचे आदेश लागू आहेत. रस्त्यांवर पोलrस व निमलष्करी दल तैनात असून नागरिकांकडून रेशन, दूध व भाजीपाला टंचाईबद्दल तक्रारी येत आहेत.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version