School Canopy Collapses : मोठी दुर्घटना! स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान शाळेचे छत कोसळून एका मुलाचा मृत्यू; दोघे जखमी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात १५ ऑगस्ट रोजी एका खाजगी शाळेत स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम सुरू असताना काँक्रीटचा कॅनोपी (प्रवेशद्वारावरील छज्जा) कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला आहे, तर अन्य दोन मुले जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कॅनोपीवर काही मुले चढली […]

School Canopy Collapses : मोठी दुर्घटना! स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान शाळेचे छत कोसळून एका मुलाचा मृत्यू; दोघे जखमी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात १५ ऑगस्ट रोजी एका खाजगी शाळेत स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम सुरू असताना काँक्रीटचा कॅनोपी (प्रवेशद्वारावरील छज्जा) कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला आहे, तर अन्य दोन मुले जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कॅनोपीवर काही मुले चढली होती आणि अतिभारामुळे ती रचना कोसळल्याने ही दुर्घटना घडली.

ही घटना संभलच्या अस्मोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मडाला फतेहपूर गावातील 'अल-हसनैन पब्लिक स्कूल'मध्ये सकाळी १० च्या सुमारास घडली. स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कॅनोपी अचानक कोसळला. यावेळी तिथे जमलेली मुले ढिगाऱ्याखाली अडकली. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ढिगारा हटवण्यास आणि अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.

कोलमडलेल्या शेडखाली (कॅनोपी) अडकलेल्या मुलांमध्ये नईम यांचा सहा वर्षांचा मुलगा 'निझाम' याचाही समावेश होता. त्याला तातडीने सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघातात इतर दोन विद्यार्थी, सातवीत शिकणारा ११ वर्षांचा सैफ अली आणि पाचवीत शिकणारी १० वर्षांची शाईदाना जखमी झाले. या दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले. नंतर पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

हेही वाचा : MP Omraje Nimbalkar : खासदार ओमराजे निंबाळकरांच्या निवासस्थानी मोठा राडा, शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले; फ्री स्टाईल हाणामारी

ही घटना घडल्यानंतर, तिथे उपस्थित असलेले लोक आणि शाळेतील कर्मचाऱ्यांनी तातडीने पडलेला ढिगारा बाजूला करून मुलांना बाहेर काढले. जखमी विद्यार्थ्यांना त्वरित वैद्यकीय उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी निझामला मृत घोषित केले. स्टेशन हाऊस ऑफिसर सुधीर पनवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर जखमी असलेल्या दोन मुलांना पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या चिमुकल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे गावातील स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवावर शोककळा पसरली असून, त्याचे कुटुंब आणि स्थानिक नागरिक दुःखात बुडाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तत्परतेने पावले उचलली. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी (SDM), सर्कल ऑफिसर (CO) आणि स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) यांनी शाळेत धाव घेतली. त्यानंतर, सकाळी ११:२५ च्या सुमारास जिल्हा दंडाधिकारी अंकित खंडेलवाल, पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिश्नोई आणि बेसिक शिक्षा अधिकारी अलका शर्मा यांनीही घटनास्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. जखमी मुलांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शाळेतील छत (कॅनोपी) कोसळण्याचे नेमके कारण काय, याचा तपास आता संबंधित अधिकारी करत आहेत. या अपघातामागे काही निष्काळजीपणा किंवा बांधकामातील त्रुटी कारणीभूत होती का, हे निश्चित करण्यासाठी त्या संरचनेची आणि अपघाताशी संबंधित परिस्थितीची सविस्तर तपासणी केली जाणे अपेक्षित आहे. या घटनेमुळे शाळांमधील सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत, विशेषतः मोठ्या सभा आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी, चिंता व्यक्त केली जात आहे. तपास जसजसा पुढे सरकेल, तसतशी अधिक माहिती उपलब्ध होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number