Scam 2010 Web Series : हंसल मेहता दिग्दर्शित Scam 2010 ची पहिली झलक! 24000 कोटींचा घोटाळा आता ओटीटीवर; हा अभिनेता साकारणार सुब्रत रॉय

मुंबई : ‘स्कॅम 2010’ (Scam 2010) मधील अभिनेता सिद्धार्थ बोडकेचा बहुप्रतिक्षित ‘फर्स्ट लूक’ अखेर समोर आला आहे. हंसल मेहता दिग्दर्शित आणि बिर्ला स्टुडिओज व ॲप्लॉज एंटरटेनमेंट यांची निर्मिती असलेली ही मालिका सध्या निर्मितीच्या टप्प्यावर आहे. इन्स्टाग्रामवर माहिती देताना ‘सोनीलिव्ह इंडिया’ने (SonyLIV India) या मालिकेचे एक पोस्टर प्रदर्शित केले. ज्यामध्ये सिद्धार्थ बोडके मध्यभागी दिसत आहे. या पोस्टरवर “स्कॅम […]

Scam 2010 Web Series : हंसल मेहता दिग्दर्शित Scam 2010 ची पहिली झलक! 24000 कोटींचा घोटाळा आता ओटीटीवर; हा अभिनेता साकारणार सुब्रत रॉय

मुंबई : ‘स्कॅम 2010’ (Scam 2010) मधील अभिनेता सिद्धार्थ बोडकेचा बहुप्रतिक्षित ‘फर्स्ट लूक’ अखेर समोर आला आहे. हंसल मेहता दिग्दर्शित आणि बिर्ला स्टुडिओज व ॲप्लॉज एंटरटेनमेंट यांची निर्मिती असलेली ही मालिका सध्या निर्मितीच्या टप्प्यावर आहे. इन्स्टाग्रामवर माहिती देताना ‘सोनीलिव्ह इंडिया’ने (SonyLIV India) या मालिकेचे एक पोस्टर प्रदर्शित केले. ज्यामध्ये सिद्धार्थ बोडके मध्यभागी दिसत आहे. या पोस्टरवर “स्कॅम 2010. एक नवीन अध्याय उलगडणार” (Scam 2010. A new chapter unfolds) असे लिहिले आहे. हा ‘फर्स्ट लूक’ शेअर करताना ‘सोनीलिव्ह इंडिया’ने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. “लाइट्स…स्कॅम-युग…ॲक्शन…इतिहासाला आणखी एक कथा सांगायची आहे. #Scam2010 ची निर्मिती अधिकृतपणे सुरू झाली आहे. आणखी एका उत्कंठावर्धक अध्यायासाठी सज्ज व्हा. लवकरच केवळ सोनीलिव्हवर (Sony LIV) प्रदर्शित होणार.”

हेही वाचा : Junior NTR Surgery: ज्युनियर एनटीआरवर शस्त्रक्रिया; पुढील 3 महिने सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला, नेमकं काय झालं?

या मालिकेच्या तिसऱ्या भागाचे दिग्दर्शन करणारे हंसल मेहता यांनी यापूर्वी ‘स्कॅम 1992’ चे दिग्दर्शन केले आहे. तसेच ‘स्कॅम 2003’ साठी ‘शो-रनर’ म्हणून काम पाहिले आहे. ‘व्हरायटी इंडिया’च्या (Variety India) अहवालानुसार, आगामी भागामध्ये सहारा समूहाचे संस्थापक आणि दिवंगत उद्योजक सुब्रत रॉय यांच्या प्रवासाचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. तसेच हा भाग तमाल बंदोपाध्याय यांच्या ‘सहारा: द अनटोल्ड स्टोरी’ (Sahara: The Untold Story) या पुस्तकावर आधारित आहे. मेहता यांच्या मते, “‘स्कॅम 2010’ ही महत्त्वाकांक्षा, प्रभाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अहंकाराची कथा आहे. भारताच्या सर्वात मोठ्या व्यावसायिक साम्राज्यांपैकी एक साम्राज्य कशा प्रकारे केवळ एका विश्वासाच्या जोरावर उभे राहिले आणि तो विश्वास डळमळीत झाल्यावर काय घडले, याचा आढावा यात घेण्यात आला आहे. एका साम्राज्याचा उदय आणि ज्या माणसाला ते साम्राज्य अजिंक्य वाटले, त्याची ही रंजक कथा आहे.”

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या सिद्धार्थ बोडकेने आपल्या पात्राबद्दल बोलताना सांगितले, “या मुख्य पात्राचे गुंतागुंतीचे व्यक्तिमत्त्व आणि या मालिकेची भव्यता पाहून मी भारावून गेलो. त्याची जिद्द, सामर्थ्य, उणिवा, झालेली प्रगती आणि अखेरीस झालेला ऱ्हास यांमुळे हे पात्र साकारणे अत्यंत रंजक ठरले आहे. हा अनुभव माझ्यासाठी अतिशय रोमांचक होता आणि हंसल मेहतांसारख्या दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली अशा विविध छटा असलेल्या पात्राची भूमिका साकारण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती.” सुब्रत रॉय यांनी 1978 मध्ये ‘सहारा इंडिया परिवार’ या समूहाची स्थापना केली. पुढे, गुंतवणूकदारांकडून बेकायदेशीरपणे 24000 कोटी रुपयांहून अधिक निधी उभारल्याच्या आरोपावरून भांडवली बाजार नियामक असलेल्या ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने (सेबी) त्यांची चौकशी सुरू केली. या वादाचे रूपांतर एका गाजलेल्या कायदेशीर लढाईत झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number