Sameer Wankhede : समीर वानखेडेंना दिल्ली हायकोर्टात मोठा धक्का! आर्यन खानच्या वेब सीरिजविरोधात मानहानी प्रकरणाची सुनावणी.. कोर्ट म्हणाले,

आर्यन खानच्या वेब सीरीजविरोधात मानहानीचा दावा करत समीर वानखेडेंनी नुकसान भरपाई मागितली होती. ही रक्कम कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती
Sameer Wankhede : समीर वानखेडेंना दिल्ली हायकोर्टात मोठा धक्का! आर्यन खानच्या वेब सीरिजविरोधात मानहानी प्रकरणाची सुनावणी.. कोर्ट म्हणाले,

Sameer Wankhede Defamation case Against The Bads of Bollywood : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आलेले माजी एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांना दिल्ली उच्च न्यायालयात मोठा धक्का बसला आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणावर आधारित असलेल्या ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ (The Bads of Bollywood) या वेब सीरिजवर बंदी घालण्याच्या त्यांच्या मागणीला कोर्टाने तत्काळ अंतरिम दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 

नेमके प्रकरण काय आहे?
समीर वानखेडे यांनी रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्स निर्मित या वेब सीरिजमुळे आपली बदनामी झाल्याचा आरोप करत त्यांच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारा आणि 2 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा मानहानीचा दावा दाखल केला होता. ही नुकसानभरपाईची रक्कम कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती.

न्यायालयाने स्थगिती देण्याचे का नाकारली?
न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने वानखेडे यांच्या याचिकेच्या 'टिकण्याच्या क्षमतेवर' (Defamation Maintainability) म्हणजेच, 'हा खटला दिल्लीच्या अधिकारक्षेत्रात दाखल करण्यायोग्य आहे की नाही', यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोर्टाने स्पष्टपणे निरीक्षण नोंदवले की, "तुमची याचिका दिल्लीमध्ये दाखल करण्यायोग्य नाही. मी ती फेटाळू शकतो."

हेही वाचा – Defamation Case: समीर वानखेडेंचा आर्यन खानच्या शोवर संताप; निर्मात्यासह नेटफ्लिक्सविरोधात 2 कोटींचा मानहानीचा खटला दाखल

कोर्टाने तोंडी टिप्पणी केली की, जर 'तुमची बदनामी दिल्लीसह अनेक ठिकाणी झाली आहे आणि सर्वात मोठे नुकसान दिल्लीत झाले आहे' असा युक्तिवाद केला असता, तर आम्ही विचार केला असता. परंतु सध्याच्या स्वरूपात याचिका वैध ठरत नसल्याने वेब सीरीजला तात्काळ स्थगिती देता येणार नाही.

याचिकेत दुरुस्ती करण्याची संधी
न्यायालयाच्या या भूमिकेनंतर समीर वानखेडे यांचे वकील वरिष्ठ अधिवक्ता संदीप सेठी यांनी याचिकेतील त्रुटी दूर करून ती दुरुस्त (Amend Plaint) करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला. न्यायालयाने त्यांना याचिका दुरुस्त करण्याची परवानगी दिली आहे.

या न्यायालयीन निर्णयामुळे समीर वानखेडे यांना आता सर्वप्रथम त्यांची याचिका दिल्लीच्या अधिकारक्षेत्रात कशी वैध ठरते, हे सिद्ध करावे लागेल. तोपर्यंत वेब सीरिजच्या प्रदर्शनावर कोणताही परिणाम होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रीय भावना दुखावल्याचा गंभीर आरोप
या याचिकेत वेब सीरिजच्या एका दृश्यावरही गंभीर आक्षेप घेण्यात आला आहे. मालिकेत एक पात्र 'सत्यमेव जयते' हा नारा दिल्यानंतर अश्लील हावभाव (Showing a middle finger) करताना दाखवण्यात आले आहे. हे कृत्य 'राष्ट्रीय सन्मानास प्रतिबंध कायदा, 1971' (Prevention of Insults to National Honour Act, 1971) चे गंभीर उल्लंघन असल्याचे याचिकेत म्हटले आहे. तसेच, आर्यन खानशी संबंधित मूळ प्रकरण अजूनही मुंबई उच्च न्यायालय आणि एनडीपीएस विशेष न्यायालयात प्रलंबित असताना, ही मालिका प्रदर्शित करण्यात येत असल्याचा आक्षेपही घेण्यात आला आहे.

हेही वाचा – AR Rahman: दिल्ली उच्च न्यायालयाचा ए. आर. रहमानला तात्पुरता दिलासा; ‘या’ खटल्यात एकल न्यायाधीशांचा आदेश रद्द

2020-21 च्या मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आली होती, ज्यात समीर वानखेडे तपास अधिकारी होते. या घटनेनंतर 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही सीरिज आली असून, त्यात आपली बदनामी करण्यात आल्याचा आरोप वानखेडे यांनी केला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version