बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक कलाकारांप्रमाणे सलमानच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं होतं आणि काल मोठ्या भक्तिभावाने विसर्जन सोहळा पार पडला. याच विसर्जनाच्या आरतीदरम्यान सलमानच्या हातून एक छोटीशी चूक घडली. मात्र त्याची लाडकी बहीण अर्पिताने लगेच ती लक्षात आणून देत चूक दुरुस्त करून घेतली. याच गोड क्षणाचा व्हिडिओ सध्या समोर आला असून, नेटकऱ्यांकडून भाईजान आणि त्याची बहीण अर्पिताच्या बॉण्डचं भरभरून कौतुक होत आहे.
व्हायरल व्हिडीओत सलमान खान बाप्पाची आरती करताना दिसतोय, पण आरती करताना त्याच्याकडून दिशा चुकली. तो उजवीकडून डावीकडे आरती करू लागला. हे बहिण अर्पिताच्या लक्षात येताच तिने लगेच त्याला खुणावले. अर्पिताने सांगताच सलमानने भुवया उंचावत आश्चर्य व्यक्त केले आणि लगेच आरतीची दिशा बदलली. हा गोड क्षण आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
सलमान खानने चूक लगेच सुधारून आरती योग्य दिशेने करण्यास सुरुवात केली. बहीण-भावामधला हा गोड आणि आपुलकीचा क्षण सध्या कॅमेऱ्यात टिपला असून त्यावर भरभरून कंमेंटन्स पाहायला मिळत आहे