साहित्य संमेलनाचा रविवारी पवारांच्या उपस्थितीत समारोप

नाशिकमध्ये होत असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज रविवारी कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे मोठ्या दिमाखात समारोप होत आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. विशेष म्हणजे पवार आणि चपळगावकर यांचे नाशिक येथे आगमन झाले असून, दिवसभरह भरगच्च कार्यक्रम […]

साहित्य संमेलनाचा रविवारी पवारांच्या उपस्थितीत समारोप

नाशिकमध्ये होत असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज रविवारी कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे मोठ्या दिमाखात समारोप होत आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. विशेष म्हणजे पवार आणि चपळगावकर यांचे नाशिक येथे आगमन झाले असून, दिवसभरह भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

संमेलनात स्वातंत्र्यवीर साहित्य दालन

नाशिक मधील ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरात मोठ्या प्रमाणात पुस्तक स्टॉल लागलेले आहेत. तब्बल २५० हुन अधिक पुस्तकांचे स्टॉल या परिसरात आहेत. याच परिसरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर साहित्य दालनाचा देखील एक स्टॉल आहे. या दालनात सावरकर यांच्यावर आधारित अनेक पुस्तक आहेत आणि या दालनाला नागरिक देखील मोठ्या प्रमाणात भेट देऊन सावरकर यांच्यावर आधारित पुस्तक खरेदी करत आहेत.

मराठी साहित्य संमेलनात हजेरी लावलेल्या इतर रसिक आणि नागरिक यांच्यासोबतच नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे हेदेखील पत्नीसह या पुस्तकाच्या नगरीत काहीकाळ रंगले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number