सनद रद्द प्रकरणी सदावर्ते यांची उच्च न्यायालयात धाव

वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आली. महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेने हा निर्णय घेतला आहे. परिषदेच्या तीन सदस्यीय शिस्तपालन समितीने सदावर्ते यांना वकील कायद्याच्या कलम ३५ नुसार गैरवर्तणुकीप्रकरणी दोषी ठरवले. तसेच दोन वर्षांसाठी त्यांची सनद निलंबित करण्याचा निर्णय घेतला. बार काऊंसिलनं वकिलीची सनद रद्द केल्या […]

सनद रद्द प्रकरणी सदावर्ते यांची उच्च न्यायालयात धाव

वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आली. महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेने हा निर्णय घेतला आहे. परिषदेच्या तीन सदस्यीय शिस्तपालन समितीने सदावर्ते यांना वकील कायद्याच्या कलम ३५ नुसार गैरवर्तणुकीप्रकरणी दोषी ठरवले. तसेच दोन वर्षांसाठी त्यांची सनद निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

बार काऊंसिलनं वकिलीची सनद रद्द केल्या प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांची मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. सदावर्ते यांनी स्वत: बाजू मांडत हायकोर्टाला माहिती दिली आहे. मात्र त्यांची बाजू ऐकण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. सदावर्ते यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी देत त्यांना त्यांच्या वकिलामार्फात कोर्टात बाजू मांडण्याचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाचे निर्देश दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number