Russia Attack on Ukraine: युक्रेनच्या विविध शहरांवर रशियाने शनिवारी आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. या आक्रमणात 1,050 ड्रोन आणि 1,000 ग्लायडर बॉम्ब वापरले गेले, ज्यामुळे 6 मुलांसह किमान 33 नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले. काही लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले आहेत.
झेलेन्स्कींनी सोशल मीडियाव दिली माहिती
युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी X वर व्हिडिओसह हल्ल्याची माहिती शेअर केली. त्यांनी सांगितले की, टर्नोपिलमधील एका निवासी इमारतीवर रशियन हल्ल्यानंतर बचाव कार्य 4 दिवस चालले. झेलेन्स्कींनी शोक व्यक्त करत मृतकांच्या कुटुंबीयांसोबत संवेदना व्यक्त केली. ‘6 लोक अजून बेपत्ता आहेत. बचाव कार्यात सहभागी कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार,’ असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – Pakistan Bullet Train: कर्जात बुडालेल्या पाकिस्तानचा आत्मविश्वास तरी पाहा! देशात सुरु करणार बुलेट ट्रेन
डनिप्रो आणि निकोपोलवरही हल्ला
रशियन सैन्याने डनिप्रोमध्येही बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात एका मुलासह 14 लोक जखमी झाले. निकोपोलमध्ये FPV ड्रोनने हल्ला केला, ज्यात 2 मुले आणि 1 महिला जखमी झाली. झेलेन्स्कींच्या म्हणण्यानुसार, रात्रीतून विविध नागरी आणि ऊर्जा सुविधांवर हल्ले सुरू होते, ज्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे.
हेही वाचा – Sheikh Hasina: ढाका आंदोलनाने पेटलं! शेख हसीनांच्या फाशीसाठी जोरदार घोषणाबाजी
Last night, search and rescue operations in Ternopil at the site where a missile struck a residential building were completed. Rescuers worked nonstop for four days. As a result of this Russian crime, 33 people were killed, including 6 children. My condolences to the families and… pic.twitter.com/Hovz4oq3px — Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) November 23, 2025
झेलेन्स्कींच्या पोस्टनुसार, रशियाने 1,050 हून अधिक अटॅक ड्रोन, जवळजवळ 1,000 ग्लाइड बॉम्ब आणि 60 हून अधिक क्षेपणास्त्र वापरले. त्यांनी पुढे सांगितले की, युक्रेन आता स्वित्झर्लंडमध्ये युनायटेड स्टेट्स, जर्मनी, फ्रान्स आणि युनायटेड किंग्डमच्या प्रतिनिधींशी संरक्षण वाढवण्यासाठी चर्चा करत आहे. राजनैतिक प्रयत्नांबरोबर, आपल्या हवाई संरक्षण प्रणाली आणि क्षेपणास्त्र संरक्षणाचे सर्व करार जलद अंमलात आणणे अत्यंत महत्वाचे आहे. जीव वाचवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी आभार मानतो, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.