दिवसेंदिवस ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नाताळ सण आणि नववर्षाच्या पार्टी, उत्साहात निर्बंध घातले आहेत. तसेच लग्नसमारंभासह अनेक कार्यक्रमांसाठी २००पेक्षा जास्त व्यक्तींच्या उपस्थितींसाठी परवानगी आवश्यक असणार आहे.
नाताळ सणासह, नववर्षांच्या पार्टीसाठी अनेकजण उत्साहित असताता. मात्र नागरिकांचा हा उत्साहांवर प्रशासनाने निर्बंध घातले आहे. नववर्षाच्या पार्टीसह येत्या काळात होणाऱ्या लग्नसोहळ्यांसह इतर कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या नोव्हेंबर महिन्यांच्या नियमात बदल करुन मुंबई महानगरपालिकेने २००पेक्षा जास्त व्यक्तींच्या उपस्थितीसाठी प्रभागातील सहाय्यक आयुक्तांची परवानगी घेणे, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी बंधनकारक केले आहे. त्याबाबतचे परीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. हा नियम धार्मिक, राजकीय कार्यक्रमांसह सर्व कार्यक्रमांना लागू असणार आहे. २४ डिसेंबरला रात्री ख्रिस्त जन्मासाठी चर्चमध्ये होणाऱ्या प्रार्थनेलाही या नियम लागू होणार आहे.
कार्यक्रमाला २०० पेक्षा जास्त माणसे असल्यास परवानगी आवश्यक.
प्रत्येक प्रभागात महानगरपालिकेची दोन भरारी पथके.
मास्क बंधनकारक, सहा फुटाचे अंतर राखणे बंधनकारक.
नियम मोडल्यास साथ नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई तसेच कारवाई करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येईल.