Dhurandhar Controversy : ‘धुरंधर’ वादावर हायकोर्टाचा निर्णय; CBFC ला ‘आर्म्ड फोर्सेस’चा सल्ला घेण्याचे निर्देश

न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितले की, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडून चित्रपटाच्या प्रमाणपत्रावर अद्याप निर्णय झालेला नाही आणि ही प्रक्रिया सुरू आहे. अशा परिस्थितीत..
Dhurandhar Controversy : ‘धुरंधर’ वादावर हायकोर्टाचा निर्णय; CBFC ला ‘आर्म्ड फोर्सेस’चा सल्ला घेण्याचे निर्देश

Dhurandhar Controversy : रणवीर सिंहची मल्टी-स्टारर फिल्म 'धुरंधर' (Dhurandhar) सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहे. मेजर मोहित शर्मा (Major Mohit Sharma) यांचा रोल रणवीरने चित्रपटात साकारला असल्याच्या चर्चा ट्रेलर आल्यापासून सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर, मेजर मोहित शर्मा यांच्या कुटुंबीयांनी दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) चित्रपटाच्या रिलीजवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली.

सीबीएफसीला महत्त्वाचे निर्देश
न्यायमूर्ती सचिन दत्ता यांनी या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी घेतली. सर्व पक्षांच्या (याचिकाकर्ता, चित्रपट निर्माते आणि सीबीएफसी) वकिलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्तींनी आपला निर्णय दिला. त्यांनी आपल्या निर्णयात सांगितले की, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC Certification) कडून चित्रपटाच्या प्रमाणपत्रावर अद्याप निर्णय झालेला नाही आणि ही प्रक्रिया सुरू आहे. कोर्टाने या याचिकेचा निपटारा करताना सीबीएफसीला निर्देश दिले की, त्यांनी मेजर मोहित शर्मांच्या कुटुंबीयांच्या चिंतेची नोंद घ्यावी. कोर्टाने सीबीएफसीला या प्रकरणावर 'आर्म्ड फोर्सेस' (Armed Forces) म्हणजेच सशस्त्र दलाचे मत घेण्याचा पर्यायही दिला आहे.

चित्रपटाच्या कल्पनेवर कोर्टात प्रश्न
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती दत्ता यांनी याचिकाकर्त्यांना थेट विचारले की, "तुम्हाला कसे कळले की हा चित्रपट त्यांच्यावर (मेजर मोहित शर्मा) आधारित आहे?" त्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी "ट्रेलरमध्ये त्यांचा उल्लेख आहे," असे उत्तर दिले. कोर्टाने पुन्हा विचारले की ट्रेलरमध्ये असा दावा कुठे केला आहे? तेव्हा वकिलांनी सांगितले की, ट्रेलर आणि इतर मटेरियल याकडेच संकेत देत आहेत, तसेच समीक्षक आणि प्रेक्षकही हेच म्हणत आहेत. कोर्टाने 'या कथेत काय अनोखे साम्य आहे' असा प्रश्न विचारला.

हेही वाचा – Mrunal Reaction On Dating Rumors : "ते बोलतात, आम्ही…" श्रेयस अय्यर की धनुष? डेटींगच्या अफवांवर मृणालच्या प्रतिक्रियेने चाहत्यांना बसला मोठा धक्का

'आर्मीकडे निर्णयासाठी का पाठवत नाही?'
यावेळी सीबीएफसीच्या वकिलांनी सांगितले की, चित्रपटाच्या प्रमाणपत्राची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. निर्मात्यांनी हा चित्रपट 'कल्पनेवर आधारित' (Fictional) असल्याचे सांगितले आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या 'एक्स' (X) पोस्टचा उल्लेखही कोर्टात करण्यात आला, ज्यात त्यांनी हा चित्रपट मेजर मोहित शर्मांशी संबंधित नसल्याचा दावा केला होता. जर आवश्यकता वाटली, तर सीबीएफसी हे प्रकरण आर्मीकडे पाठवू शकते, असे कोर्टात सांगण्यात आले. यावर कोर्टाने लगेच, "जर अशी गरज आहे, तर तुम्ही तो चित्रपट आर्मीकडे का पाठवत नाही?" असा प्रश्न केला.

खासगी स्क्रीनिंगची मागणी फेटाळली
याचिकाकर्त्याने मेजर मोहित शर्मा यांच्या कुटुंबासाठी चित्रपटाचे खासगी स्क्रीनिंग (Private Screening) ठेवण्याची मागणी केली, परंतु कोर्टाने यावर निर्णय देण्यास नकार दिला. "जे सीबीएफसी करू शकते, ते आम्ही करू शकत नाही. आम्ही फक्त तुमच्या चिंतांवर लक्ष देण्यास सांगू शकतो आणि ते (सीबीएफसी) यावर नक्कीच लक्ष देतील," असे कोर्टाने सांगून या प्रकरणाचा निपटारा केला. धुरंधर चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा – Dhurandhar Movie Update : 'धुरंधर'समोर मोठा पेच! प्रदर्शनाच्या तोंडावर दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल, शहीद मेजरच्या कुटुंबीयांची काय आहे मागणी?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version