राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून काही भागांमध्ये ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. घाटमाथ्यावर जोरदार सरी कोसळत आहेत. आज रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि पुण्यातील घाटमाथ्याचा काही भाग वगळता राज्यात जोरदार पावसाचा इशारा नाही. बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान राज्यातील घाटमाथ्यामध्ये हवामान खात्याने येलो अलर्ट जारी करत मुसळधार पावसाची शक्यता वर्तावली आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. मुंबईसह नवी मुंबई, पालघर आणि ठाण्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर कोकणात रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. यावेळी पालघर, ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून उष्णता जाणवण्याची शक्यता आहे.मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या भागात सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे.
दरम्यान पुढील काही दिवसही अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशिममध्ये जोरदार पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. तर राज्यातील उर्वरीत जिल्ह्यामध्ये श्रावण सरी कोसळण्याचा अंदाज आहे. याठिकाणी ऊन पावसाचा खेळ सुरू राहिल