Radhika Merchant : राधिका मर्चंटचे मौल्यवान पांढऱ्या सोन्याचे खड्याळ; 1,700 हून अधिक हिरे – पाचू जडवलेल्या दुर्मिळ घड्याळाची किंमत बघून व्हाल अवाक्

मुंबई : अंबानी कुटुंबातील धाकटी सून राधिका मर्चंटला लक्झरी आणि आलिशान गोष्टींची उत्तम जाण आहे. उत्कृष्ट दागिने असोत किंवा खास ‘स्टेटमेंट ॲक्सेसरीज’, तिच्या फॅशनची शैली अनेकदा फॅशनप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरते. नुकत्याच मुंबईत झालेल्या डिझायनर जोडी अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या 40 व्या वर्धापन दिन सोहळ्यात, राधिकाने एम्ब्रॉयडरी केलेले जॅकेट-स्टाईल टॉप आणि प्रिंटेड स्कर्ट परिधान करून सर्वांचे […]

Radhika Merchant  : राधिका मर्चंटचे मौल्यवान पांढऱ्या सोन्याचे खड्याळ; 1,700 हून अधिक हिरे – पाचू जडवलेल्या दुर्मिळ घड्याळाची किंमत बघून व्हाल अवाक्

मुंबई : अंबानी कुटुंबातील धाकटी सून राधिका मर्चंटला लक्झरी आणि आलिशान गोष्टींची उत्तम जाण आहे. उत्कृष्ट दागिने असोत किंवा खास ‘स्टेटमेंट ॲक्सेसरीज’, तिच्या फॅशनची शैली अनेकदा फॅशनप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरते. नुकत्याच मुंबईत झालेल्या डिझायनर जोडी अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या 40 व्या वर्धापन दिन सोहळ्यात, राधिकाने एम्ब्रॉयडरी केलेले जॅकेट-स्टाईल टॉप आणि प्रिंटेड स्कर्ट परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, तिने घातलेल्या एका दुर्मिळ घड्याळाने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले. 

हेही वाचा : LPG Cylinder: केंद्राचा मोठा निर्णय! आता 45 दिवसांचा नियम रद्द; फक्त इतक्या दिवसांत नवा सिलिंडर बुक करता येणार

राधिका मर्चंट यांचे दुर्मिळ पाटेक फिलिप घड्याळ

राधिका ‘पाटेक फिलिप ट्वेंटी-4 हॉट ज्वेलरी’ (Patek Philippe Twenty-4 Haute Joaillerie – Ref. 4909-107G) हे घड्याळ परिधान केलेली दिसली. हे एक अत्यंत दुर्मिळ आणि ‘युनिक पीस’ म्हणून तयार केलेले उच्च-दर्जाचे दागिने-शैलीतील घड्याळ आहे. या घड्याळाचा आकार आयताकृती असून तो किंचित वक्र आहे. हे घड्याळ 18-कॅरेट पांढऱ्या सोन्यापासून बनवलेले असून त्याची रुंदी सुमारे 24 मिमी आणि लांबी 27.8 मिमी इतकी आहे. याचा डायल पूर्णपणे हिरे आणि पाचू यांनी जडलेला आहे. तर ‘फ्युई-स्टाईल’ (feuille-style) काटे आणि 12 व 6 या अंकांच्या जागी असलेले रोमन अंक याची अभिजात सुंदरता अधिक वाढवतात.

परंतु, या घड्याळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यावरील अत्यंत बारकाईने आणि कलाकुसरीने केलेली रत्नांची जडणघडण. या घड्याळात एकूण 864 ‘बॅगेट-कट’ (baguette-cut) हिरे आहेत. ज्यांचे वजन सुमारे 33.64 कॅरेट आहे. तसेच 1.62 कॅरेट वजनाचे आणखी 855 हिरे यात वापरले आहेत. याव्यतिरिक्त, यात 1.29 कॅरेट वजनाचे 54 ‘मार्कीज-कट’ (marquise-cut) पाचू आणि 1.69 कॅरेट वजनाचे आणखी 241 पाचू जडलेले आहेत. एकूणच, या नेत्रदीपक घड्याळात 1700 हून अधिक हिरे आणि पाचू (emeralds) जडवलेले आहेत. ज्यांचे एकत्रित वजन 38 कॅरेटपेक्षा जास्त आहे.

राधिकाच्या घड्याळाची किंमत किती ?

‘द इंडियन होरोलॉजी’ (The Indian Horology) या इन्स्टाग्राम पेजनुसार, ‘पाटेक फिलिप ट्वेंटी-4 हॉट जोएलेरी रेफ. 4909-107 जी’ या घड्याळाची किरकोळ विक्री किंमत सुमारे 1,60,000 डॉलर्स इतकी होती. जी भारतीय चलनात साधारणपणे 1.51 कोटी रुपये इतकी होते. पांढऱ्या सोन्याची रचना, पाचू आणि हिऱ्यांची नाजूक जडणघडण आणि वैशिष्ट्यपूर्ण ब्रेसलेट डिझाइनमुळे, हे घड्याळ केवळ एक पारंपरिक वेळ दाखवणारे यंत्र नसून, परिधान करण्यायोग्य एक उच्च दर्जाचा दागिना आहे. राधिकाच्या लूकबद्दल सांगायचे झाले तर, राधिकाने या सोहळ्यात एक वैशिष्ट्यपूर्ण फ्यूजन सौंदर्य सादर केले. तिने भरतकाम केलेला जॅकेट-स्टाईल टॉप आणि प्रिंटेड स्कर्ट परिधान केला होता. ज्यात पारंपरिक डिझाइन आणि आकर्षक डिझाइन यांचा मिलाफ होता.

फुलांच्या नक्षीमुळे या पोशाखाला एक नाजूक स्पर्श मिळाला, तर जॅकेट आणि प्रिंटेड स्कर्टमुळे एक आकर्षक आणि आधुनिक लुक तयार झाला. तिने हा लुक एका सुंदर हिरव्या पाचूच्या पेंडंट नेकलेस, स्टेटमेंट इअररिंग्स आणि बोटातील मोठ्या हिऱ्याच्या अंगठीने पूर्ण केला. सॉफ्ट-ग्लॅम मेकअप आणि अर्धवट बांधलेल्या केसांच्या स्टाईलने हा पारंपरिक लुक उत्तमरित्या पूर्ण केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number